Wednesday, July 3, 2024

‘पब्लिसिटीसाठी ही नग्नदेखील होईल’, उर्फी जावेदचा बोल्ड लूक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध आणि वादग्रस्त शोपैकी एक असलेल्या ‘बिग बॉस’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. या शोचे यश म्हणजे आता या शोचे १५ वे पर्व सुरू आहे. या शोने आजपर्यंत अनेक स्पर्धकांना एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. यापैकीच एक म्हणजे उर्फी जावेद होय. उर्फी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती आपल्या वक्तव्यामुळे, तर कधी आपल्या फॅशन सेन्समुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. तिला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता तिचे चर्चेत येण्याचे कारणही असेच काहीसे आहे. ती पुन्हा एकदा रिव्हिलिंग अंदाजात विमानतळावर स्पॉट झाली. यादरम्यानचे तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच नेटकरीही तिला ट्रोल करत आहेत.

ओव्हरकोटच्या खाली परिधान केली ब्रा
खरं तर, उर्फीने ओव्हरकोटच्या खाली मॅचिंग रंगाची ब्रा परिधान केली आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उर्फीने विमानतळावर पॅपराजींसमोर आपला लूक फ्लॉन्ट केला आहे. तिचे चाहते तिच्या या लूकवर अक्षरश: फिदा झाले आहे. त्यांना तिचा हा लूक प्रचंड आवडला आहे. मात्र, तिला दुसरीकडे ट्रोल केले जात आहे. (Bigg Boss OTT Fame Urfi Javed Bold Pose Wearing Bra Under Overcoat Airport Video Viral)

नेटकऱ्यांकडून ट्रोल
नेटकरी उर्फीच्या या लूकमुळे तिला चांगलेच ट्रोल करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “स्वत:ला असं एक्सपोझ करून तुला काय भेटतं?” आणखी एकाने लिहिले की, “आता राहिलंच काय होतं?” दुसऱ्या एकाने लिहिले की, “इतक्या शिव्या खातेस, तरीही स्वत:ला एक्सपोझ करणं सोडत नाहीस.” याव्यतिरिक्त आणखी एक युजरने लिहिले की, “पब्लिसिटीसाठी ही नग्नदेखील होईल.” संस्कृतीवरून एका युजरने तिला सुनावले. त्याने कमेंट करत लिहिले की, “आमच्या संस्कृतीत हे सर्व चालत नाही.”

उर्फी बनली होती ‘बिग बॉस ओटीटी’चा भाग
उर्फी ‘बिग बॉस ओटीटी’मध्येही झळकली होती. मात्र, ती जास्त वेळ ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात टिकू शकली नाही. ती सुरुवातीच्या आठवड्यातच घरातून बाहेर झाली होती. असे म्हटले जात होते की, कदाचित उर्फीला ‘बिग बॉस १५’मध्ये संधी मिळेल. मात्र, सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये दिसली नाही. विशेष म्हणजे ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये अयशस्वी झालेल्या काही स्पर्धकांना ‘बिग बॉस १५’मध्ये संधी देण्यात आली आहे.

अतरंगी आऊटफिटमुळे असते चर्चेत
उर्फीबद्दल बोलायचं झालं, तर ती कधी प्लॅस्टिक बॅगच्या ब्रामुळे, तर कधी मोज्यांच्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर झाल्यानंतर ती नेहमीच आपल्या वेगवेगळ्या लूकमुळे सर्वांचे लक्ष वेधत असते. असे असले, तरीही घरातून बाहेर पडल्यानंतर अद्याप तिला कोणताही प्रोजेक्ट ऑफर करण्यात आलेला नाही.

हे देखील वाचा