‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसलेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या जबरदस्त फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. उर्फी सतत तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आजकाल ती तिच्या अभिनयासाठी कमी आणि तिच्या विचित्र कपड्यांसाठी जास्त ओळखली जाते. आपल्या आऊटफिट्समुळे चर्चेत असलेल्या उर्फीने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, उर्फीचे असे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या फोटोंमध्ये उर्फीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
उर्फीने परिधान केला सर्वात बोल्ड ड्रेस
उर्फीचे हे फोटो तिच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आले आहेत. उर्फीचा बोल्ड लूक पाहून तिच्या चाहत्यांचे भान हरपत आहे. उर्फीने बदामी रंगाची पारदर्शक ब्रालेट परिधान केलेली दिसत आहे. त्याचबरोबर तिने जांभळ्या रंगाचा जाळीदार स्कर्ट कॅरी केला आहे. फोटोंमधील उर्फीची बोल्ड स्टाईल पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
बोल्डनेस पाहिल्यानंतर भडकले युजर्स
उर्फीच्या या फोटोंवर चाहते सतत कमेंट करत आहेत आणि तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत. त्याचवेळी पारदर्शक कपड्यांवरून काही युजर्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले, “हे पूर्ण कपडे आहेत का?” दुसऱ्याने लिहिले, “तुमचे कपडे कोण डिझाइन करतं.” आणखी एका युजरने लिहिले, “कपडे खरेदी केल्यावर शिलाई उसवून घालता का? हे डिझायनर कपड्यांसारखे दिसत नाहीत.” अशाप्रकारे उर्फीला ट्रोल केले जात आहे.
ट्रोलर्सला दिले ‘असे’ उत्तर
उर्फीला तिच्या कपड्यांवरून अनेकदा ट्रोल केले जाते. मात्र, ट्रोल करून तिच्यावर काहीही फरक पडत नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. नुकताच स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करताना उर्फीने ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले. व्हिडिओमध्ये उर्फीने लाल रंगाच्या टॉपसह डेनिम जीन्स परिधान केलेली दिसत आहे. तिने वर जॅकेट परिधान केले. व्हिडिओमध्ये ती म्हणते, “जे माझ्या कपड्यांवरून मला ट्रोल करतात त्यांच्यासाठी हे माझे उत्तर आहे.” यानंतर उर्फी मागे वळते आणि तिच्या जॅकेटवर लिहिलेले असते, “माइंड युवर ओन बिझनेस.”
उर्फी जावेदची ट्रोलर्सला उत्तर देण्याची ही पद्धत तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
-रणबीर कपूरचा आकर्षक फोटो शेअर करत, अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रदर्शनाबाबत दिले संकेत