Wednesday, July 3, 2024

अनोख्या फॅशन सेन्समुळे पुन्हा चर्चेत आली उर्फी जावेद, व्हायरल फोटोवर ट्रोलर्सचा निशाणा

लोकप्रिय रियॅलिटी शो ‘बिग बाॅस ओटीटी’मध्ये सहभागी झालेली उर्फी जावेद सतत चर्चेत असते. टीव्ही स्टार असण्याव्यतिरिक्त उर्फी हे सोशल मीडियावर चर्चेत असलेले एक मोठे नाव आहे. तिच्या बिनधास्त अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. अनेकदा ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिच्या बोल्डनेसमुळे नेटकरी अनेकदा तिच्यावर निशाणा साधत असतात. कित्येकदा अभिनेत्रीला ट्रोलर्सशी सामना करावा लागला आहे. तसेच चाहते उर्फीच्या फोटोवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडत असतात. नुकतेच समोर आलेले उर्फीचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये उर्फीने क्राॅप स्कर्ट आणि बॅकलेस टाॅप परिधान केला आहे. तसेच तिने पाढर्‍या रंगाची ओढणीही डोक्यावर घेतली आहे. उर्फीचा हा ड्रेस समोरून अगदी साध्या पद्धतीचा असला, तरी पाठीमागील बॅकलेस असणार्‍या या ड्रसने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या दरम्यान तिला पाहून पॅपराजींनी तिचे फोटो काढले आहेत. मात्र, उर्फी या ड्रेसिंग सेन्समुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. (bigg boss ott fame urfi javed in discussion again with unique fashion photos going viral)

सोशल मीडियावर तिचे हे फोटो जोरदार व्हायरल होते आहे. उर्फीचे यापूर्वी पर्पल कलरच्या ड्रेसमधील काही फोटो व्हायरल झाले‌ होते. उर्फीला त्या बोल्ड अवतारामुळे प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अनेक नेटकर्‍यांनी तिच्या ड्रेसवर वेगवेगळ्या कमेंट केल्या होत्या. उर्फी तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून सतत फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. इंस्टाग्रामवर तिचे १.५ मिलियनहून अधिक फाॅलोअर्स आहेत.

उर्फीविषयी बोलायचे झाले, तर अलिकडेच ती ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये झळकली होती. यापूर्वी ती ‘चंद्र नंदिनी’,’ मेरी दुर्गा’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां और डायन’ या मालिकांमध्ये झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी’मध्ये पाहायला मिळाला सोनाली पाटीलचा कोल्हापुरी रांगडा बाज; केली ‘या’ स्पर्धकांची नक्कल

-‘सांग काम्या हो नाम्या’ कार्यात महिलांचे नखरे पुरवताना पुरुषांच्या नाकी नऊ, तर जय दुधानेला आले रडू

-‘…आणि आम्ही हो म्हणालो,’ अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांनी चाहत्यांना दिली ‘ही’ गोड बातमी

हे देखील वाचा