Friday, July 5, 2024

Bigg Boss OTT: धमाकेदार वीकेंडमध्ये पाहुणे म्हणून येणार ‘सिडनाज’, पुन्हा एकदा पाहायला मिळणार त्यांची केमिस्ट्री

‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला वीकेंड खूप मजेदार असणार आहे. प्रेक्षकांना या शोचे पहिले एविक्शन पाहायला मिळेल, तर सोबतच त्यांचे आवडते जोडपे शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांना पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘बिग बॉस १३’ ची प्रसिद्ध जोडी दोन दिवसांनंतर पाहुणे म्हणून करण जोहरच्या शोमध्ये प्रवेश करणार आहे. याच दरम्यान, शोमध्ये जाण्यापूर्वी शहनाजला पुन्हा सिद्धार्थची साथ मिळणार असल्याने ती खूप आनंदी आहे. एवढेच नाही, तर शहनाज बिग बॉसच्या शोबद्दल म्हणाली की, “यामुळे मला एक नवीन ओळख, एक भावनिक नाते मिळाले आहे.”

माध्यमातील वृत्तानुसार, पंजाबची ‘कॅटरिना कैफ’ अर्थात शहनाज गिल म्हणाली की, “बिग बॉसने मला खूप काही दिले आहे. एक नवीन ओळख, एक भावनिक बंध आणि एक व्यक्ती तो म्हणजे सिद्धार्थ शुक्ला. ज्यांच्याकडे मी एक मित्र म्हणून पाहू शकते. बिग बॉस ओटीटीच्या घरात सिद्धार्थ शुक्लासोबत आल्यामुळे मला खूप आनंद होत आहे.”

सिद्धार्थ आणि शहनाज ‘सिडनाज’ म्हणून ओळखले जातात. जेव्हा जेव्हा दोघे एकत्र दिसतात, तेव्हा ते इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. चाहत्यांना ही जोडी नेहमीच आवडली आहे. त्यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. त्याचबरोबर ‘सिडनाज’च्या लोकप्रियतेवर शहनाज म्हणाली की, “मी नेहमीच प्रेक्षकांची आभारी आहे. मला इतके प्रेम आणि आदर दिल्याबद्दल धन्यवाद. मी पुन्हा माझ्या आवडत्या शोचा भाग होण्यासाठी उत्साहित आहे. इतर जोडप्यांसोबत राहणे आणि करण सरांना भेटणे माझ्या खूप आनंददायक असेल.”

काही दिवसांपूर्वीच वूटच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. ज्यात सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल आगामी वीकेंड एपिसोडमध्ये बिग बॉस ओटीटीचे पाहुणे असतील असे सांगण्यात आले होते. हे दोघेही स्पर्धकांसोबत वेळ घालवणार आहेत. यासोबत ही जोडी प्रेक्षकांनी केलेल्या प्रश्नांची उत्तरेही देईल. हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शन लिहिले की, ‘कोण सर्वात खास आहे आणि कोण सर्वांच्या हृदयाजवळ आहे, फक्त आणि फक्त ‘सिडनाज’ २ वर्षांनंतर येत आहे.’

आता हे पाहणे उत्सुकतेचे असेल, की सिडनाज ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये आल्यानंतर किती मज्जा मस्ती करतील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शास्त्रीजींच्या सल्ल्यावरून मनोज कुमारांनी बनवला हिट चित्रपट, त्यातल्या ‘मेरे देश की धरती सोना उगले…’ गाण्याने तर गाजवला काळ

-ही आहे हॉलिवूडमधील सर्वाधिक श्रीमंत कलाकारमंडळी, संपत्तीचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल दंग

-‘काश माझी मुलं त्यांना भेटू शकली असती…’ वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त रितेश झाला भावुक; मुलांसोबत वाहिली श्रद्धांजली

हे देखील वाचा