Monday, June 9, 2025
Home अन्य अवघ्या काही तासातच सुरु होणार बिग बॉस ओटीटी, शोआधी करणने दाखवली घराची झलक

अवघ्या काही तासातच सुरु होणार बिग बॉस ओटीटी, शोआधी करणने दाखवली घराची झलक

जेव्हा पासून ‘बिग बॉस’ या विवादित शोचे नवीन पर्व ओटीटीवर सुरु होणार असल्याचे जाहीर झाले आहे, तेव्हापासूनच या शोबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवाय या शोला करण जोहर होस्ट करणार असल्याचे समजल्यानंतर, तर ही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सोशल मीडियावर हा शो कधी सुरु होणार? कोण कोण स्पर्धक असणार? असे अनेक प्रश्न विचारले जात होते. याबद्दलचे वेगवेगळे प्रोमो आतापर्यंत समोर आले आहे.

मात्र आता पुढच्या काही तासातच प्रेक्षकांची उत्सुकता संपणार असून, त्यांना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. हा शो लवकरच नवीन फॉरमॅटमध्ये प्रेक्षकांच्या समोर येण्यास सज्ज झाला आहे. शो सुरु होण्यापूर्वी काही तास आधी बिग बॉस ओटीटीचा सूत्रसंचालक असणाऱ्या करण जोहरने एक खास व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करण ‘कभी ख़ुशी कभी गम’ या गाण्यावर बिग बॉसच्या घरात प्रवेश करतो आणि संपूर्ण घरात फेरफटका मारतो. या छोट्या व्हिडिओमध्ये बिग बॉसच्या आलिशान आणि आकर्षक घराची झलक पाहायला मिळत आहे.(host karan johar shares new bigg boss ott promo video)

हा व्हिडिओ शेअर करताना करणने लिहिले, “आता लवकरच तुमची उत्सुकता संपणार असून, या ओटीटीच्या जगात मी माझे पहिले पाऊल टाकण्यासाठी फक्त एकच पाऊल दूर आहे. तुम्ही आणि मी खूप एन्जॉय करणार आहोत. सांगितले ना बस सांगितले.” असे कॅप्शन त्याने दिले आहे. करण या शोचे सूत्रसंचालन करणार ही कल्पनाच भन्नाट असल्याने सर्वांना याबद्दल जरा जास्तच उस्तुकता आहे.

बिग बॉसचे हे पर्व प्रेक्षकांना २४ तास ओटीटीवर बघता येणार आहे. अधिक बोल्डनेस, अधिक अवघड टास्क, अधिक वाद, या सर्व अनेक अधिक असणाऱ्या गोष्टी यावेळेस नक्कीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार यात तिळमात्रही शंका नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा