Monday, June 9, 2025
Home अन्य ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात महिलांबद्दल केलेले वक्तव्य राकेशला पडले महागात, करण जोहरने घेतली शाळा

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात महिलांबद्दल केलेले वक्तव्य राकेशला पडले महागात, करण जोहरने घेतली शाळा

सध्या ‘बिग बॉस ओटीटी’ हा रियॅलिटी शो वादग्रस्त शो म्हणूनच ओळखला जातो. बिग बॉसच्या घरात रोज काही ना काही नवीन घडत असतं. स्पर्धकांमध्ये होणारे टोकाचे वाद तर प्रचंड गाजतात. प्रत्येक आठवड्याच्या रविवारी बिग बॉसचा ‘संडे का वॉर’ हा भाग प्रसारित केला जातो. या आठवड्याचा हा ‘संडे का वॉर’ भाग खूपच रंजक होता. शोचा होस्ट असणाऱ्या करण जोहरने नेहमीप्रमाणे, आठवडाभर घडलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, घटनांवर स्पर्धकांचे कौतुक आणि सोबतच त्यांच्यावर ओरडताना, चिडताना दिसला. यादरम्यान करणने शमिता शेट्टीसोबत राकेश बापटचे बदललेले वर्तन आणि महिलांविषयी त्याने केलेल्या वक्तव्याबाबत राकेशची शाळा घेतली.

महिलांबद्दल बोलताना राकेश बापट म्हणाला होता की, “महिलांच्या तुलनेत पुरुष हे बलवान असतात.” याच वक्तव्याबद्दल करणने राकेशला खडसावले आणि विचारले की, “याचा अर्थ तू महिलांना कमकुवत समजत आहेस.”

करण जोहरने राकेश बापटला सांगितले की, “तू अशी प्रतिक्रिया व्यक्त करायला नको होती. सध्या आपण अशा काळात जगत आहोत जिथे कोणीही कोणापेक्षा कमी नाही किंवा जास्त नाही.” करणच्या या बोलण्यानंतर राकेशने आपल्या स्पष्टीकरणात सांगितले की, “महिलांची शक्ती काय आहे हे मला माहीत आहे. मी अशा घरात लहानचा मोठा झालो आहे ज्या घरात महिला कायमच माझ्या आजूबाजूला होत्या.”

राकेशच्या शमिताबद्दल अचानक बदललेल्या वागण्यावर शमिता नेहासोबत बोलताना म्हणाली, “काही दिवसांपासून राकेशच्या वागण्यात झालेल्या बदलामुळे मी दुखावली गेली आहे. राकेश बापटच्या मनात दिव्या अग्रवालसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे. बिग बॉसमध्ये चार आठवडे एकत्र घालवल्यानंतर आता राकेश उद्धटपणे वागत आहे. तिला वाटतंय राकेश तिच्या मागे मागे येतोय, मात्र राकेशला तिच्यात काहीच रस नाहीये.”

जेव्हा राकेश बापटने शमिता आणि दिव्या अग्रवाल यांच्यातील भांडणात शमिताला साथ दिली नाही, तेव्हा दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. याआधीही शमिता नेहाशी बोलताना म्हणाली होती की, ‘राकेश तिच्यासाठी बनवलेला नाही.’

जसं जसे बिग बॉस ओटीटीचे हे पहिले पर्व अंतिम भागाकडे सरकत आहे तसं तसे अजून अनेक लहान मोठे बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! मल्याळम अभिनेता रिजाबावा यांचे दीर्घ आजाराने झाले निधन

-सिद्धार्थच्या निधनानंतर ॲडमिट झाली होती जसलीन, नवीन व्हिडिओमुळे पुन्हा झाली ट्रोल

-Bigg Boss OTT: ‘राकेश तालावर नाचणारा नाहीये’, काम्या पंजाबीने साधला शमिता शेट्टीवर जोरदार निशाणा

हे देखील वाचा