Wednesday, July 3, 2024

‘बिग बॉस ओटीटी’ मधून मुस्कान जट्टाना झाली बेघर, निरोप देताना प्रतीकला अश्रू अनावर

प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’ शेवटच्या टप्प्यावर आला आहे. या शोचा अंतिम सोहळा १६ सप्टेंबर रोजी होणार आहे. अशा स्थितीत, रविवारी (१२ सप्टेंबर) रोजी, मूस जट्टाना या शोमधून बाहेर पडली. त्याचबरोबर आता ‘बिग बॉस ओटीटी’ च्या घरात ट्रॉफीची लढाई शमिता शेट्टा, राकेश बापट, निशांत भट्ट, दिव्या अग्रवाल, प्रतीक सहजपाल आणि नेहा भसीन यांच्यात होणार आहे. मूस जट्टाना घरातून बाहेर पडत असताना प्रतीक सहजपाल तिला निरोप देताना रडला. सर्व कलाकार हे आता अंतिम फेरीसाठी आपापसात लढताना दिसतील. आता ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो कोण जिंकते हे पाहणे महत्त्वाचे असेल.

‘रविवार का वॉर’ भागाच्या सुरुवातीला, करण जोहरने कुटुंबातील सर्व सदस्यांची शाळा घेतली. यानंतर एमएक्स टकाटक कलाकार आशिका आणि अक्षय यांनी घरातील सदस्यांसोबत मजा मस्ती केली. त्यानंतर गायिका नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांनी ही घरतील सर्व सदस्यांचे मनोरंजन केले. तसेच शोचा होस्ट करण जोहरने विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीची पहिली झलक देखील दाखवली.

घरातून बाहेर पडलेली मूस जट्टानाचे खरे नाव मुस्कान जट्टाना आहे. ती सोशल मीडियावर तुफान सक्रिय आहे. मुस्कान जट्टानाने यावेळी बिग बॉसमध्ये भाग घेतला आहे. तिने निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांची करण जोहरच्या समोर स्टेजवर जोडी म्हणून निवड केली होती. परंतु शेवटी तिची जोडी निशांत भट्टसोबत राहिली. मुस्कान जट्टानाचे नाव अनेक वादांशी संबंधित आहे.

मुस्कान उर्फ ​​मूस जट्टाना सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओंमुळे अनेकदा चर्चेत असते. तिचे असे अनेक व्हिडिओ आहेत ज्याने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. २० वर्षांची मुस्कान जट्टाना चंदीगड आणि मोहालीची आहे. तिने मेलबर्न मधून शिक्षण पूर्ण केले आहे.

ऑस्ट्रेलियन-पंजाबी इन्फ्लुएंसर म्हणून मुस्कान सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची मोठी यादी आहे. तिचा इंस्टा बायो देखील सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिच्या बायोमध्ये तिने लिहिले आहे की, “अजून उध्वस्त होणं बाकी आहे.” मुसने अगदी लहान वयात महिला आणि तरुणांसाठी काम केले आहे. ती ऑस्ट्रेलियन दक्षिण आशियाई केंद्राची ब्रँड अँबेसिडर आहे. मुस्कान जट्टाना अनेकदा तिच्या सोशल मीडियावर लिंग समानतेच्या अनेक पोस्ट शेअर करते. अनेक माध्यमांच्या अहवालांमध्ये असे म्हटले गेले की, मुस्कान जट्टानाने वेबसाइटवर थेट न्यूड सत्र केले होते.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! मल्याळम अभिनेता रिजाबावा यांचे दीर्घ आजाराने झाले निधन

-सिद्धार्थच्या निधनानंतर ॲडमिट झाली होती जसलीन, नवीन व्हिडिओमुळे पुन्हा झाली ट्रोल

-Bigg Boss OTT: ‘राकेश तालावर नाचणारा नाहीये’, काम्या पंजाबीने साधला शमिता शेट्टीवर जोरदार निशाणा

हे देखील वाचा