Tuesday, July 9, 2024

राकेश आणि शमिताच्या नात्याला हिरवा कंदील, कुटुंबीयांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. या शोमध्ये प्रेम आहे आणि वाद दाखवले जातात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रेक्षकांना ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये भरपूर मसालेदार गोष्टी पहायला मिळत आहे. काही स्पर्धक सतत एकमेकांशी लढत आहेत, तर शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यातील जवळीकता वेळेबरोबर वाढत असल्याचे दिसत आहे. दोघेही हळूहळू त्यांच्या मैत्रीला एका नवीन वळणावर घेऊन जात आहेत. शोमध्ये राकेश शमिता शेट्टीला कधी गालावर, तर कधी हातावर सतत किस करतो.

सोशल मीडियावर शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची जोडी चाहत्यांना खूप आवडत आहे. या काळात प्रत्येकाला वाटते की, राकेश आणि शमिताचे नाते नक्की आहे तरी कोणते? त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, त्या दोघांच्या नात्यावर त्यांच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया दिली आहे. शमिता शेट्टीची बहीण शिल्पा शेट्टीने अद्यापही त्यांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या दोघांच्या वाढत्या जवळीकीवर अभिनेता राकेशच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दोघांच्या नात्यावर प्रतिक्रिया देताना राकेशची बहीण म्हणाली, “ते दोघेही खूप गोंडस दिसतात. मला त्यांचे नाते खूप छान वाटते. दोघांची केमिस्ट्री अप्रतिम आहे. दोघांचे बाँडिंग ही प्रचंड सुंदर आहे. एक कुटुंब म्हणून आम्ही एक चांगले संबंध सामायिक करतो. परंतु जेव्हा वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही त्यात हस्तक्षेप करत नाही.”

माध्यमांतील वृत्तांनुसार, राकेशची बहीण बोलताना पुढे म्हणाली की, “राकेशला लोकांच्या आसपास राहणे फारसे आवडत नाही. आम्ही बिग बॉस बघत नाही, आम्हाला फक्त एवढेच माहित आहे की, त्यात अनेक स्पर्धक मारामारी करतात. माझा भाऊ एक अशी व्यक्ती आहे जी फक्त शांत राहणेच पसंत करते. ‘बिग बॉस’च्या घरात तो कसा टिकेल हे आम्हाला समजत नाही.” तसेच ती म्हणाली, “माझ्या मुलीला तिच्या मामाला पडद्यावर पाहायला खूप आवडते.”

दरम्यान, जेव्हा दिव्या आणि शमिता घरात आल्या, तेव्हा काही दिवस दोघींमध्ये चांगले बाँडिंग होते, पण त्यानंतर अचानक वीकेंड वॉरनंतर मोठी भांडण झाली. त्यामुळे दोघांनी एकमेकींशी बोलणे बंद केले. शमिता स्वतः दिव्या अग्रवालपासून दूर राहते आणि तिचा पार्टनर राकेश बापटने दिव्या अग्रवालशी बोलू नये अशी तिची इच्छा आहे. ज्यामुळे ती राकेशला वारंवार दिव्याशी बोलण्यापासून आडवत असते. यावर राकेश खूप चिडला आणि शमिताला म्हणाला की, तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयात २२ वर्षांचे अंतर असूनही अमिताभ यांचे खास मित्र होते आदेश; वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी झाला मृत्यू

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-‘सोनालीची झलक सबसे अलग!’ अभिनेत्रीच्या साडीलूकने चाहत्यांना केलं डायरेक्ट ‘क्लीन बोल्ड’

हे देखील वाचा