Friday, April 18, 2025
Home अन्य Bigg Boss OTT: उफ्फ! शमिता शेट्टीने राकेश बापटकडे मागितली किस; म्हणाली, ‘आज तू खूपच…’

Bigg Boss OTT: उफ्फ! शमिता शेट्टीने राकेश बापटकडे मागितली किस; म्हणाली, ‘आज तू खूपच…’

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात अनेक नवनवीन गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत. याच शोमधील स्पर्धक शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडत आहे. त्याचबरोबर हे दोघे एकमेकांचे कनेक्शन आहेत. त्यांची ही जवळीकता पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत. चाहत्यांना असे वाटत आहे की, या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय का? तर आता या दोघांमधील जवळीकता दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये दोघांमध्ये काही रोमँटिक क्षण दिसून आले.

या व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, शमिता जेवण करत आहे. तर राकेश ते जेवण मायक्रोवेव्हमध्ये गरम करत होता. तेव्हा शमिता राकेशला म्हणाली की, “ते जास्त गरम करू नको, नाहीतर ते कडक होईल.” त्यावर राकेश म्हणाला की, “अजून काही?” शमिताने राकेशकडे एक सेकंद पाहिले आणि म्हणाली की, “तुला काही अडचण आहे का? मी हे नाही सांगणार मग.” तर राकेश म्हणाला की, त्याला काहीच अडचण नाहीये आणि तो फक्त विचारत आहे, की तुझ्याकडे बोलायला आणखी काय आहे. (The video went viral after Shamita asked for a kiss from Bigg Boss’s ‘Serial Kisser’)

तेव्हा शमिता अलगद हसत म्हणाली की, “इकडे ये आणि मला आता एक किस दे” राकेशही लगेचच तिच्याकडे जातो आणि गालावर किस करत तिचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर शमिता नेहा भसीनला म्हणाली की, “खूप गोड.” “हे फक्त यासाठीच कारण तो खूप क्यूट दिसत आहे ना, म्हणून…” असे म्हणत शमिता पुन्हा जेवण करू लागली. या अगोदर ही चाहत्यांनी राकेश आणि शमिताला अनेक वेळा एकमेकांशी फ्लर्ट करताना पाहिले आहे. इतकेच नव्हे तर राकेशने यापूर्वी ही शमिताला प्रेमाने किस केले होते.

दोघांनी एकमेकांसोबत भावनिक क्षणही शेअर केले आहेत. जसे की जेव्हा शमिता आणि निशांत भटमध्ये एका टास्क दरम्यान वाद सुरू झाला. त्यानंतर राकेश शमिताला शांत करण्याचा प्रयत्न करताना ही सोडून आला. राकेशने शमितासोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील बरेच क्षण शेअर केले आहे. अलीकडच्या भागात, जेव्हा राकेश रडणाऱ्या दिव्या अग्रवालला समजावत होता, हे सर्व शमिताला आवडले नव्हते. इतकेच नव्हे तर त्यावरून दोघांमध्ये वाद ही झाला होता. शमिता म्हणाली होती, “तू का समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेस? मी तुझी गर्लफ्रेंड नाही.” यानंतर त्यांनी एकमेकांमधील सर्व गैरसमज दूर केले. पण हे पाहणे उत्सुकतेचे असेल की, या दोघांची फक्त मैत्रीच राहील की पुढे आणखी काही होईल?

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट

-कंगनासोबत ब्रेकअपनंतर तुटून गेला होता अध्ययन; वडील शेखर यांच्या ‘या’ सल्ल्याने दिली त्याला हिंमत

निर्मात्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप; तर पत्रिका वाटप होऊनही ‘या’ कारणामुळे मोडले होते शिल्पाचे लग्न

हे देखील वाचा