मागील काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो सुरू होता. बिग बॉस हा वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर घरात गेलेल्या स्पर्धकांचा बाहेर दुनियेची काही काळ संबंध तुटतो. त्यांना बाहेर घडणाऱ्या घटनाबद्दल काहीच कल्पना नसते. त्याचबरोबर या स्पर्धकांना घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांसोबत विशिष्ट कालावधीपर्यंत राहावे लागते. मात्र ‘बिग बॉस १३’ चा विजेता दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनाची बातमी ‘बिग बॉस ओटीटी’ च्या सर्व स्पर्धकांना देण्यात आली होती.
जेव्हा ही बातमी स्पर्धकांना सांगितली होती तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. इतकेच नव्हे तर या शोची विजेती दिव्या अग्रवालला देखील खूप मोठा धक्का बसला होता. खरं तर, शोमध्ये अनेक वेळा दिव्या सिद्धार्थबद्दल बोलताना दिसली होती. सिद्धार्थच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदरच सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल दोघेही ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये स्पर्धकांना भेटण्यासाठी पोहचले होते. त्यानंतर जसा जसा शो पुढे जात होता, तसे तसे एक -एक स्पर्धक घराबाहेर पडत होते. घराबाहेर पडल्यानंतर स्पर्धकांना याबद्दल संपूर्ण बातमी मिळाली. (bigg boss ott winner divya agrawal was shocked to know about sidharth shukla death share emotional post)
याच दरम्यान ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेती दिव्या अग्रवाल शोमधून परतल्यानंतर तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सिद्धार्थ शुक्लाचा फोटो पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. इतकेच नव्हे तर दिव्याने सिद्धार्थ शुक्लाला तिचा ‘चांगला मित्र’ म्हटले आहे. दिव्याने लिहिले की, “कोणीतरी बरोबर म्हटले आहे, ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांना आपण नेहमी गमावून बसतो. त्याचबरोबर ते शेवटपर्यंत आपल्या हृदयाशी जोडलेले असतात. मला सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी फायनलच्या अगोदर समजली होती. ही बातमी माझ्यासाठी धक्कादायक बातमी होती. त्याचा या क्षेत्रातील प्रवासातून बरेच काही शिकायला मिळाले, ज्यामुळे मला नेहमी प्रेरणा मिळाली. ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते कुठेही जात नाहीत, ते नेहमी आपल्या आठवणी आणि बोलण्यात असतात.”
लाईव्ह सेशनमधूनही वाहिली श्रद्धांजली
दिव्या ‘बिग बॉस ओटीटी’ मधून विजयी होऊन आल्यापासून ती सतत तिच्या कामात व्यस्त असते. काही दिवसांपूर्वीच, ती तिच्या चाहत्यांशी इंस्टाग्राम लाइव्ह सेशनमधून बोलताना दिसून आली. ज्यामध्ये ती सिद्धार्थ शुक्लाबद्दल देखील बोलली. दिव्या म्हणाली की, तिला सिद्धार्थची आठवण येते. शोमधून बाहेर आल्यानंतर तिची अशी अपेक्षा होती की, सिद्धार्थ तिला सांगेल की ती खूप छान खेळली आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी
-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’