बिग बॉस ओटीटीची पहिली एलिमिनेशन फेरी रविवारी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी होती. शोमधील तीन शिलेदार म्हणजे राकेश बिपट, शमिता शेट्टी आणि उर्फी जावेद यांना पहिल्या फेरीतून बाहेर पडण्यासाठी नामांकित करण्यात आले. या दरम्यान, करण जोहरने या वेळी तिघांनाही विचारले की, ते आतापर्यंत त्यांच्या कामगिरीबद्दल काय विचार करत आहेत आणि कोणाला वाटते की ते शोमधून बाहेर पडतील. पण या दरम्यान तिन्ही स्पर्धक नाराज होते. याबरोबरच उर्फी जावेदचा प्रवास या शोमध्ये इथेच थांबला आहे.
उर्फी जावेद आहे तरी कोण?
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत उर्फीने काम केले आहे. उर्फी लखनऊची रहिवासी आहे. तिचा जन्म १५ ऑक्टोबर १९९६ रोजी झाला. तिने सिटी मॉन्टेसरी स्कूलमधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. यानंतर एमिटी युनिवर्सिटी विद्यापीठातून मास कम्युनिकेशन क्षेत्रातून पदवी घेतली.

साल २०१६ मध्ये उर्फीने सोनी टीव्हीच्या ‘बडे भैया की दुल्हनिया’ या मालिकेत अवनीची भुमिका साकारली आणि आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर, २०२० मध्ये, तिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या सिरीयलमध्ये शिवानी भाटियाची भूमिका साकारताना दिसली. तिने ‘कसौटी जिंदगी की’मध्ये तनिषा चक्रवर्तीची भूमिका साकारली होती. आता बिग बॉसकडून तिच्या कारकिर्दीला चालना मिळेल आहे. २५ वर्षांच्या उर्फीने अनेक पात्रांच्या भुमिका साकारल्या आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’च्या शोमध्ये उर्फीने कागदी पिशव्यांचा ड्रेस परिधान केल्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे.
उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर सध्या तिचे १.४ दशलक्ष फॉलोव्हर्स आहेत. ती अनेकदा तिचे फोटो वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोस्ट करते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. तिचे चाहते तिच्या फोटोला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. तसेच उर्फीने तिच्या अभिनयाने आणि सुंदर दिसण्याने अनेक चाहत्यांची मन जिंकले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-स्वातंत्र्यदिनाचा उत्साह परदेशातही! अमेरिकन व्यक्तीने ‘चक दे इंडिया’ गाण्यावर केला भन्नाट डान्स










