Thursday, October 16, 2025
Home अन्य ‘मला दिव्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले’, नेहाच्या वक्तव्यावर विजेतीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘मला दिव्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले’, नेहाच्या वक्तव्यावर विजेतीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

वादांमुळे कायम चर्चेत असलेला शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस ओटीटी’ काही दिवसांपूर्वीच संपले आहे. या शोने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. दिव्या अग्रवालने या शोमध्ये बाजी मारली. सध्या हा शो संपला असला, तरी देखील यातील वाद अजून संपले नाहीत. अनेक स्पर्धक घराबाहेर गेल्यांनतर देखील एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात सुरू झालेले वाद बाहेरही सुरूच आहेत. अशात नेहा भसीन सध्या तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.

बिग बॉसच्या घरात नेहाचे दिव्या आणि मूस बरोबर अनेक वेळा वाद झाले होते. अशात हे वाद आता देखील सुरू आहेत. नेहाने दिव्या आणि मूसमुळे तिला झालेला त्रास सर्वांना सांगितला आहे. तिला खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास झाला आहे. तसेच ती यामुळे खूप डिप्रेशनमध्ये असून तिला आत्महत्या करावी वाटत आहे. (Bigg Boss vote Neha Bhasin depression and suicidal thought Divya Agrawal react on Neha’s statement)

नेहाने या शोमधून बाहेर आल्यांनतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये संगीतले की, “दिव्याला माहित होते की अंतर्वस्त्रांवरून बोललेली गोष्ट मला प्रभावित करत आहे. मला त्याचा त्रास होत आहे आणि खरोखरच मला याचा खूप त्रास होत होता. शोमध्ये असताना खूप मोठ्या प्रमाणावर मला तोडण्याचा प्रयत्न केला गेला. मी खूप रडायचे पण मला अशा पद्धतीने तोडून टाकणं खूप कठीण होतं. त्यामुळेच सतत मला त्रास दिला जायचा.”

पुढे ती म्हणाली की, “आता मी एक वक्तव्य करणार आहे. मला माहित आहे हे खूप खळबळजनक आहे. पण हे खरे आहे की, माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच दिव्या माझ्या मनाशी खेळली, तिच्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये गेले. तिने मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. माझ्या या वक्तव्यामुळे तिच्या कुटुंबियांना कदाचित वाईट वाटेल. मी त्यांची माफी देखील मागते, पण हे सत्य आहे. दिव्याने मलाच नाही, तर बिग बॉसच्या घरातील अन्य स्पर्धकांना देखील अशी वागणूक दिली आहे.”

शोमधून बाहेर आल्यानंतर दिव्याने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, “हे सर्व खरचं हास्यस्पद आहे. एखादी व्यक्ती कोणाला एवढं कसं प्रभावित करू शकते. नेहा तर नेहमी म्हणायची की ती खूप धीट आणि मजबूत आहे. एक मजबूत महिला देखील भीतीचा स्वीकार करत असते. नेहाने घरामध्ये अनेकवेळा तिला लहानपणासून अनेकांनी त्रास दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ती खूप मजबूत झाली आहे, असे ती म्हणाली होती. मला असं वाटतं की, असं सर्व आयुष्यात घडत असताना कोणतीच गोष्ट आपल्याला प्रभावित करू शकत नाही.”

दिव्या पुढे म्हणाली की, “जेव्हा तुम्ही महिलांविषयी बोलत असता की महिला अशा आहेत महिला तशा आहेत. मला असं म्हणायचंय तिने स्वतः काय केलं? जसं की मला माहीतच नाही बाहेर काय दाखवतायत? बाहेर काय होणार? जसं काही ती कधीच म्हणाली नाही. मी बाहेर कशी दिसेल? पहिले तर हे असे विचार करणं बंद करायला पाहिजे. जेव्हा आपण असे करू तेव्हाच स्वतःमध्ये थोडा समजूतदारपणा येईल. असो तिला जर बरं वाटतं नसेल, तर तिला मी हे सर्व सल्ले देऊ इच्छिते आणि ती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करते.”

दिव्याच्या अशा बोलण्याने ‘बिग बॉस’च्या घरातील तिचे आणि नेहाचे वाद बाहेरही असेच सुरु राहणार का? असा प्रश्न चाहत्यांना वाटत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाळेची फी भरण्यासाठी गुलशन ग्रोव्हर यांनी विकली डिटर्जेंट पावडर, मोठ्या संघर्षाने झाले बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’

-कपूर घराण्याचे पाश तोडत केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तर ‘या’ कारणामुळे बेबोने राकेश रोशन यांना दिला होता डच्चू

-‘कन्यादाना’बद्दल बोलणे ‘बबली गर्ल’ला पडले भलतेच महागात, सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप

हे देखील वाचा