Monday, July 1, 2024

क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

सध्या अनेक दिग्गज व्यक्तींवर बायोपिक येत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील महान लोकांवर या बायोपिक तयार होतात. आजपर्यंत मनोरंजन, खेळ, राजकारण आदी अनेक क्षेत्रातील लोकांवर आतापर्यंत बायोपिक तयार झाल्या आहेत. यात आता अजून एका बायोपिकची भर पडणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे अध्यक्ष असणाऱ्या सौरभ गांगुली यांच्यावर बायोपिक येत आहे.

नुकतेच लव फिल्म्सने सौरभ यांच्या जीवनावर चित्रपट करणार असल्याची घोषणा केली आहे. सौरभ गांगुली यांच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच एक आनंदाची बातमी आहे. लव फिल्म्सच्या अधिकृत सोशल मीडियावर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुली यांना ‘दादा’ म्हणून ही ओळखले जाते. सौरभ हे निर्विवादपणे भारताच्या सर्वात यशस्वी आणि वादग्रस्त कर्णधारांपैकी एक आहे. प्रत्येकाच्या हृदयात त्यांना विशेष स्थान आहे. सौरभ यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अशक्य वाटणारे सामने त्यांच्या खेळाने टीमला जिंकून दिले. तर त्यांच्या कॅप्टनशिपच्या काळात त्यांनी आणि टीमने भारताला अनेक मोठे विजय मिळवून दिले, विविध रेकॉर्ड्स तयार केले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील यशस्वी कर्णधार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सौरभ यांनी क्रिकेटमध्ये एक काळ गाजवला हे तर सर्वानाच माहित आहे, मात्र ते मैदानापर्यंत पोहचले कसे? त्यांनी हे यश मिळवण्यासाठी कशी आणि किती मेहनत घेतली? असे अनेक प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतात. मात्र आता या चित्रपटाच्या निमित्ताने सर्वांच्याच मनातील प्रश्नांना उत्तरं मिळणार आहेत. त्यामुळे मोठ्या पडद्यावर सौरभ यांचा जीवनपट पाहायला मिळणे चाहत्यांसाठी नक्कीच मेजवानी ठरणार आहे.

सौरभ गांगुली यांनी त्यांच्या खेळाने म्हणून ९० चे दशक खूप गाजवले होते. आज सौरभ हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत. गांगुली यांच्या क्रिकेटमुळे, क्रिकेटमधील विक्रमांमुळे आणि त्यांच्या वादग्रस्त वृत्तीमुळे देखील तितकेच ओळखले जातात. त्यांच्या आयुष्यात असे अनेक पैलू होते जे जाणून घेणे सर्वांसाठी नेहमीच आकर्षणाचा आणि उत्सुकतेचा विषय होता. मात्र यातल्या बऱ्याच गोष्टी कधी जास्त लोकांसमोर आल्या नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी नक्कीच माहित होणार आहे.

सौरव गांगुली यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग हे दोघे करणार आहेत. लव फिल्म्सने आता पर्यंत ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘दे दे प्यार दे’, ‘मलंग’ आणि ‘छलांग’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनित ‘कुत्ते’ आणि ‘उफ्फ’ या चित्रपटांचा समावेश आहे.

माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात १९९२ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पदार्पण केले होते. तर त्यांनी शेवटचा एकदिवसीय सामना त्यांनी पाकिस्तान विरुद्ध २००७ मध्ये खेळला. त्याचबरोबर सौरव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ११९६ मध्ये पदार्पण केले. तर शेवटचा सामना २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला. सौरभ गांगुली यांना त्यांच्या क्रिकेटमधील अमूल्य योगदानासाठी भारत सरकारच्या सर्वोच्च अशा पद्मश्री पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवर एन्जॉय करताना दिसले ‘ही मॅन’; चहा पित म्हणाले, ‘चीयर्स!’

-‘मी विराट कोहलीच्या प्रेमात वेडी झाले होते’, म्हणत ऋतिक रोशनच्या ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

-रवी तेजा ईडीच्या कार्यालयात हजर, मनी लॉन्ड्रिंगसह ‘या’ प्रकरणीही करण्यात आली चौकशी

हे देखील वाचा