Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

सोप्पा नव्हता बिपाशाचा बॉलीवूडचा ‘बिल्लो राणी’ होण्याचा मार्ग, पैसे वाचविण्यासाठी एकवेळ करायची १० रुपयांत जेवण

बॉलिवूडची बिल्लो राणी म्हणजेच बिपाशा बासूचा ७ जानेवारी रोजी वाढदिवस झाला. बिपाशा या ७ तारखेला ४२ वर्षांची झाली. आतापर्यंत आपण बिपाशाला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये पाहिलंय. तिचे बहुतेक चित्रपट हे भयपट आहेत. परंतु या यशस्वी बॉलिवूड करकीर्दीपर्यंत पोहोचण्याचा बिपाशाचा प्रवास हा काही सोपा नव्हता. काय काय घडलं बिपाशाच्या संघर्षाच्या काळात चला आज जाणून घेऊयात.

बिपाशा बासूचं नेहमीच तिच्या स्टाईल आणि फिगरबद्दल कौतुक झालं. एके दिवशी बिपाशा हॉटेलवर पोहोचली आणि सुपरमॉडेल मेहर जेसियाची (अर्जुन रामपालची पहिली पत्नी) तिच्याशी भेट झाली. फिटनेस आणि तिची वैशिष्ट्ये जाणून घेऊन मॉडेलिंग करण्याचा सल्ला तिने बिपाशाला दिला. मेहेरच्या सांगण्यावरून बिपाशाने १९९६ मध्ये सुपर मॉडल स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा जिंकली. यानंतर, बिपाशाने मियामी येथे आयोजित जागतिक स्पर्धेच्या फोर्ड सुपर मॉडेलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यानंतर बिपाशाला अभिनेता डिनो मौर्याबरोबर कमर्शियल जाहिरात करण्याची ऑफर आली होती. दोघांनीही आपल्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरुवात जवळपास एकाच वेळी केली होती.

बिपाशा आणि डिनो यांनी बर्‍याच मॉडेलिंग प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलं होतं, यामुळे दोघांची मैत्री आणखीनच घट्ट झाली आणि दोघेही नात्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री झाल्यानंतर एका मुलाखतीत बिपाशाने तिच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितलं होतं की ती आणि डिनो पैसे वाचवण्यासाठी १० रुपयांत जेवण करत. त्यावेळी चपाती आणि भात दहा रुपयांच्या प्लेटमध्ये मिळत असे, जे अन्न दोघेही पैशांची बचत करण्यासाठी वाटून घेत होते.

२००१ मध्ये रिलीज झालेल्या मल्टिस्टारर फिल्म ‘अजनबी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पणानंतर बिपाशा २००२ मध्ये पहिल्यांदाच राज चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. विक्रम भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात डिनो मौर्यादेखील मुख्य भूमिकेत होता. चित्रपटात एकत्र दिसण्यापूर्वीच त्यांच्या अफेअरची बातमी चर्चेत होती. पण त्याचवर्षी दोघेही वेगळे झाले. ब्रेकअपनंतरही बिपाशा आणि डिनो चांगले मित्र राहिले आहेत. यानंतर अभिनेता जॉन अब्राहमबरोबर बिपाशाचं नाव जोडलं गेलं.

बिपाशाने फोर्ड सुपरमॉडल कॉन्टेस्ट जिंकताना स्पर्धेचे परीक्षक असलेले विनोद खन्ना यांची नजर बिपाशा बासूवर पडली. विनोद यांना आपला मुलगा अक्षय खन्ना याच्यासमवेत बिपाशाला हिमालय पुत्र या चित्रपटामधून लाँच करण्याची इच्छा होती पण अभिनेत्रीने पदार्पणाची ही सुवर्ण संधी नाकारली. या भूमिकेसाठी ती खूपच लहान असल्याचं बिपाशाचं मत होतं.

विनोद खन्ना यांच्या व्यतिरिक्त जया बच्चन यांनी जे.पी. दत्ताचा आखरी मोगल या चित्रपटामधून मुलगा अभिषेक सोबत लॉन्च करण्याची ऑफर दिली होती जी बिपाशाने मान्यदेखील केली होती, काही कारणास्तव हा चित्रपट होऊ शकला नाही. नंतर, जेपी दत्ता यांनी पटकथा बदलली आणि करीना कपूरबरोबर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटातही बिपाशाला सुनील शेट्टी सोबत काम करण्याची ऑफर मिळाली पण पुन्हा तिने नकार दिला. यानंतर तिने २००१ मध्ये आलेल्या अजनबी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

अजनबी या मल्टीस्टारर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान करीना कपूर खान आणि बिपाशा यांच्यातील भांडण हे इंडस्ट्रीमधील सर्वात वादग्रस्त भांडणांपैकी एक आहे. काही डिझायनर कपडे आणि सीन्सवरून दोघींमध्ये जोरदार वाद झाले ज्यात करीनाने तिला काळी मांजर देखील म्हटलं होतं. रंगभेदाची टिप्पणी ऐकून बिपाशा खूप दुःखी झाली. वादादरम्यान करीनाने बिपाशाचा तत्कालीन प्रियकर डिनो मौर्यालाही एक्सप्रेसेशन लेस म्हणून संबोधलं होतं. संपूर्ण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघींमध्ये सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरून वाद होतच राहायचे.

हे देखील वाचा