Monday, July 1, 2024

बिपाशाने मुलगी देवीचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करताना लिहिली भावनिक पोस्ट म्हणाली, ‘आईवडील स्वतःला आणि मुलांना…’

बिपाशा बसू सध्या चित्रपटांपासून लांब तिचे मदरहूड एन्जॉय करत आहे. असे असले तरी ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. ती सतत तिच्या मुलीबद्दल विविध अपडेट देताना दिसते. २०१६ साली अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्न केल्यानंतर सहा वर्षांनी बिपाशा आई झाली. बिपाशा आणि करण नेहमीच त्यांच्या मुलीचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र अद्याप त्यांनी त्यांच्या मुलीचा चेहरा दाखवलेला नाही.

करण आणि बिपाशा दोघेही त्यांचे पॅरेंटहूड मस्त एन्जॉय करत असून, त्यांच्या मुलीच्या सर्व आठवणी ते कायमस्वरूपी आपल्याजवळ कैद करताना दिसत आहे. यासाठी ते फोटो व्हिडिओसोबतच इतरही विविध पद्धतींनी त्या आठवणी आपल्याजवळ ठेवत आहे. आता त्यांनी नुकतेच त्यांच्या मुलीचा आठवणीला कायम स्मरणात ठेवण्यासाठी एक काम केले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशा बसूने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक सुंदर क्युट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करण आणि बिपाशा त्यांच्या मुलीच्या हाताला आणि पायांना कास्टिंग करताना दिसत आहे. त्यांच्या मुलीने देवीने सुरेख गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला असून, ती आरामात आईच्या खांद्यावर डोके ठेऊन उभी आहे, मात्र या व्हिडिओमध्ये देखील त्यांनी देवीचा चेहरा दाखवलेला नाही.

बिपाशाने हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “देवी वरून आमच्या आयुष्यात आशीर्वाद स्वरूपात आली आहे. एक आईवडील म्हणून आम्हाला तिच्या लहानपणात सर्वच आठवणींना सजवून ठेव्याचे आहे. तिच्या लहान हात आणि पायांची भावना अशी आहे जी आम्हाला आयुष्यभर एन्जॉय करायची आहे. भावना जसरा तुझे खूप खूप धन्यवाद. कारण तुझ्यामुळे या आठवणी आता कायम आमच्याकडे असतील. हे खरंच खूपच सुंदर गिफ्ट आहे. जे आईवडील स्वतःला आणि आपल्या मुलांना देऊ शकतात.” बिपाशा बसूच्या या व्हिडिओवर तिचे फॅन्स आणि नेटकरी भरभरून कमेंट्स करत त्यांचे प्रेम त्या तिघांवर दाखवत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाडं फुटलं रे! अखेर क्रितीने तिच्या सीक्रेट बाॅयफ्रेंडचा केला खुलासा, नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

राजीवने चारुच्या वाढदिवशी केली अशी काही पाेस्ट की, युजर्स संतापूण म्हणाले, ‘कधी तुमचा घटस्फोट…’

हे देखील वाचा