Wednesday, July 16, 2025
Home बॉलीवूड समुद्राच्या मध्यभागी बसून करण ग्रोवर घेतोय सनबाथ, बिपाशाने शुट केलाय हटके व्हिडीओ

समुद्राच्या मध्यभागी बसून करण ग्रोवर घेतोय सनबाथ, बिपाशाने शुट केलाय हटके व्हिडीओ

बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री बिपाशा बसू ही आपला पती ‘करण सिंग ग्रोवर’ याच्यासोबत मालदीवमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे . यावेळी मज्या मस्ती करतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या चाहत्यांना अपडेट देताना दिसत आहे. बिपाशाने तिच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंटवरून करण सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

बिपाशाने सोशल मीडियावर जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात करण सिंग ग्रोवर समुद्राच्यामध्ये बसलेला आहे. आणि सनबाथची मजा घेत आहे. परंतु कडक उन्हाने तो खूपच त्रासलेला दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव असे आहेत की, जणू काही त्याच्या जवळ एखादी तळपती आग आहे.

करणचा या व्हिडीओला बिपाशाने शूट केले आहे. हा व्हिडीओ बनवताना, बिपाशा त्याच्या या परिस्थितीवर खूप हसत होती. या व्हिडीओ सोबत तिने असे कॅप्शन दिले आहे की, ‘मंकी लव्ह.’

इंस्टाग्रामवरून या व्हिडिओमधील करणच्या बॉडीला पाहून सगळे प्रेक्षक खूप कमेंट करताना दिसत आहे आणि त्याचे कौतुक देखील करत आहेत. त्याच्या एका चाहत्याने अशी कमेंट केली आहे की,” मी याच्यामुळे खूप प्रेरित झालो आहे, मला देखील अशीच बॉडी करायची आहे.”

बिपाशा आणि करण यांनी 2016 साली लग्न केले. त्या दोघांच्या लग्नाच्या आधी बिपाशा बसू अभिनेता जॉन अब्राहम सोबत जवळपास 10 वर्ष रिलेशनमध्ये होती. या दोघांचा लग्नाला घेऊन देखील अनेक चर्चा होत्या परंतु ते दोघे एकत्र आले नाहीत. नंतर बिपाशा आणि करण यांनी लग्न केले. बिपाशाच्या आधी करण याची 2 लग्न झाली होती.

हे देखील वाचा