Saturday, July 6, 2024

चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या हेअरकटने प्रसिद्ध झाल्या साधना, चांगलाच गाजला होता ‘साधना हेअरकट’

गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूड एकापेक्षा एक चित्रपट देऊन रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. अनेक तरुण मुलं-मुली हे चित्रपटांमध्ये अभिनेते आणि अभिनेत्री जसे कपडे परिधान करतात, तसेच स्वतः देखील घेणे पसंत करतात. आपल्या आवडत्या कलाकारासारखे हेअरकट करण्याकडे देखील तरुणांचा कल जास्त असतो. अशात साठच्या दशकात मुलींचा ‘साधना’ हेअरकट खूप गाजला होता. अभिनेत्री साधना यांच्या नावाने या हेअरकटला हे नाव देण्यात आले होते. साधना यांचा जन्म पाकिस्तान येथील कराचीमध्ये २ सप्टेंबर, १९४१ रोजी झाला होता. गुरुवारी (२ सप्टेंबर) त्यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या जीवनप्रसाविषयी जाणून घेऊयात.

साधना या साठच्या दशकातील एक उत्तम आणि बहुचर्चित अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहायचे. आजही अनेक चाहते साधना यांच्या आठवणीत त्यांचे जुने चित्रपट आवडीने पाहतात. साधना यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फाळणी दरम्यान त्यांचे कुटुंब कराची सोडून मुंबईमध्ये येऊन स्थायिक झाले. साधनांना एकही भावंडं नव्हते. त्यांच्या आई- वडिलांच्या त्या एकुलती एक मुलगी होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच त्या खूप लाडात आणि प्रेमात वाढल्या. (Birthday anniversary: Apart from films, Sadhna became famous because of her haircut, this is how Chhaya Sadhna cut)

त्यांना अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. बालवयात देखील त्यांनी अनेक चित्रपट केले आहेत. साधना यांचा पहिला चित्रपट ‘श्री ४२०’ हा होता. या चित्रपटामध्ये काम करत असताना त्यांचे वय अवघे १४ वर्षे होते. राज कपूर यांच्या या चित्रपटामध्ये ‘मूड मूड के ना देख’ या गाण्याला त्यांच्या कोरसची साथ मिळाली होती. वयाच्या १६व्या वर्षी साधना यांनी पहिल्या सिंधी चित्रपटात आपली भूमिका साकारली. त्या चित्रपटाचे नाव ‘अबाना’ होते. या चित्रपटानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात यशाचे चांगलेच शिखर गाठले. त्यानंतर साधनांनी ‘मेरा साया’, ‘वो कौन थी’ आणि ‘वक्त’ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय साकारला. त्यांनी तब्बल ३५ फिचर चित्रपटांमध्ये काम केले आहे.

साधना हेअरकट कसा आला नावारूपाला?
सुप्रसिद्ध अभिनेत्री साधना आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकत होत्या. अशात त्यांना एक गोष्ट सतत त्रास देत होती. एक अभिनेत्री म्हणून काम करायचे म्हणजे सुंदर दिसले पाहिजे. परंतु या अभिनेत्रींचे कपाळ थोडे मोठे असल्याने त्यांची सुंदरता थोडी झाकली जात होती. त्यासाठी त्यांनी उपाय शोधत नवीन हेअरकट तयार केला. त्यांनी आपल्या कपाळावर समोरील थोडे केस घेत त्यांना छानसा आकार दिला. हा हेअरकट त्यांना खूप शोभून दिसत होता. त्यामुळे अनेक तरुणी त्या काळी साधनांसारखे दिसण्यासाठी हा हेअरकट करत होत्या. त्यामुळे या हेअरकटला पुढे साधना यांच्या नावाने ओळखले जाऊ लागले. आणि ‘साधना हेअरकट’ जन्माला आला.

अभिनेत्रींच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर या अभिनेत्रीने दिग्दर्शक आरके नय्यर यांच्याशी विवाह केला होता. नय्यर साधनांपेक्षा वयाने बरेच मोठे होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाला साधनांच्या आई- वडिलांची फारशी पसंती नव्हती, तरी देखील त्यांनी साल १९६६ मध्ये नय्यर यांच्याशी विवाह केला. अभिनेत्री त्यांच्या पतीला लाडाने ‘रुमी’ असे म्हणत होत्या. साधना यांना दम्याचा त्रास असल्याने त्यांनी मुलं होऊ दिली नाहीत. साधना यांनी आरके नय्यर दिग्दर्शित बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले. साल १९९५मध्ये त्यांच्या पतीने या जगातून अखेरचा निरोप घेतला. त्यानंतर २५ डिसेंबर, २०१५मध्ये साधना यांची प्राणज्योत मालवली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थ शुक्लाप्रमाणेच ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी देखील घेतला कमी वयात याजगाचा निरोप, जाणून घ्या त्यांची नावे

-‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

सिद्धार्थ शुक्लाची चटका लावणारी एक्झिट; मॉडेलिंगने मिळाली होती आयुष्याला कलाटणी, जाणून घ्या त्याचा प्रवास

हे देखील वाचा