Friday, July 5, 2024

पदार्पणातच पटकावला होता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, ‘या’ कारणामुळे ईशा देओलने अभिनयाला केले स्वतः पासून लांब

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी, ईशा देओलने 2002 मध्ये ‘कोई मेरे दिल से पूछे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील ईशाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि तिला ‘कोई मेरे दिल से पूछे’साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. या चित्रपटात तिच्यासोबत आफताब शिवदासानी दिसला होता. ईशा देओल आज तिचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्या दिवशी मुंबईत तिचा जन्म झाला होता.

ईशा देओल 2000 च्या दशकात बॉलिवूडमध्ये सक्रिय होती. 2002 मध्ये तिने ‘कोई मेरे दिल से पूछे’ मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, परंतु 2011नंतर तिने मोठ्या पडद्यापासून स्वतःला लांब केले. ती आता अजय देवगणच्या ‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमधून पुनरागमन करत आहे. अलीकडेच ईशा 10 वर्षे बॉलिवूडपासून दूर का राहिली, याबद्दल खुलेपणाने व्यक्त झाली. (birthday esha deol why did she not appear in films for a decade)

ईशा देओलने अलीकडेच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आणि सांगितले की, ती इतके दिवस चित्रपटांपासून दूर राहिली. ईशाच्या म्हणण्यानुसार, तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अभिनयातून ब्रेक घेतला, कारण तिला तिच्या आयुष्यात व्यवस्थित सेटल व्हायचे होते.

अभिनेत्रीने सांगितले की, “मला माझे पती भरत तख्तानीसोबत सेटल होऊन कुटुंब सुरू करायचे होते. मी फक्त प्रेमात होते आणि त्याचा आनंद घेत होतो. जर तुम्ही काम करत असाल, तर त्याचा चांगला आनंद घेऊ शकणार नाही.” ईशा देओल पुढे म्हणाली की, “जेव्हा तुमची मुले खूप लहान असतात तेव्हा प्रत्येक गोष्टीकडे योग्य लक्ष दिले पाहिजे.” ईशाच्या म्हणण्यानुसार, एका महिलेसाठी स्थायिक होणे आणि कुटुंब सुरू करणे महत्त्वाचे आहे.

‘रुद्र’ या वेब सीरिजमधून आपल्या पुनरागमनाबद्दल ती म्हणाली की, “अजयसोबत पुन्हा काम करणे ही एक अशी गोष्ट आहे, ज्याची मी पूर्ण आतुरतेने वाट पाहत होते.” ‘रुद्र’ या वेबसिरीजमध्ये ती आपला दमदार अभिनय दाखवणार आहे. ‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’ हा ब्रिटीश वेब सिरीज ‘ल्युथर’चा रिमेक आहे. वेब सिरीज लवकरच Disney + Hotstar VIP वर लॉन्च होईल. याची कथा एका पोलीस अधिकाऱ्याच्या भोवती फिरते.

हेही नक्की वाचा-
वृत्तपत्राची एडिटर ते एक नावाजलेली अभिनेत्री, ‘असा’ आहे सोनाली कुलकर्णीचा अभिनयप्रवास
धक्कादायक! राहत्या घरी गुदमरून ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, जगभरातील चाहते शोकसागरात

हे देखील वाचा