हॉलिवूडच्या टॉप मॉडेल्सपैकी एक केंडल जेनर तिच्या बोल्ड फोटो आणि हॉट स्टाइलसाठी ओळखली जाते. केंडल जेनरने मॉडेलिंगच्या जगात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि अगदी लहान वयातच ती टॉप मॉडेल्सपैकी एक बनली आहे. केंडलने वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेलिंग कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने तिचे शालेय शिक्षणही पूर्ण केले नाही आणि काही वर्षांतच ती तिच्या मेहनतीने सर्वाधिक कमाई करणाऱ्या मॉडेल्सपैकी बनली. तिचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. केंडल जेनर बुधवारी (३ नोव्हेंबर) आपला २६ वा वाढदिवस साजरा करत आहे.
केंडलचा जन्म ३ नोव्हेंबर १९९५ रोजी लॉस एंजेलिसमध्ये झाला. ती प्रसिद्ध मॉडेल किम कार्दशियनची धाकटी बहीण आहे. केंडल ही अमेरिकेतील सेलिब्रिटींपैकी एक आहे. जगभरात तिचे चाहते खूप आहेत. एवढेच नाही, तर सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या करोडोंच्या घरात आहे. केंडलची गणना अमेरिकेतील रनवे मॉडेल्समध्ये केली जाते.
केंडलने ‘लव्ह’ मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केल्याने ती खूप चर्चेत आली होती. तिच्या या फोटोशूटची बरीच चर्चा झाली होती. ती किम कार्दशियनची सावत्र बहीण आहे. मात्र, तिची ओळख कार्दशियन बहिणींमुळे आहे हे तिला आवडत नाही. तिने एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या बहिणींमुळे तिच्याकडे लक्ष वेधले जाते हे तिला आवडत नाही. इतकेच नाही, तर केंडलने बहिणींना तिच्या फॅशन शोमध्ये जाण्यासही अनेकदा नकार दिला आहे.
वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर केंडल तिची बहीण काइली जेनरसह ‘केंडल’ आणि ‘काइली’ नावाच्या ब्रँडसाठी कपडे डिझाइन करते. केंडलने तिची बहीण काइलीसोबत एक एडल्ट कादंबरीही लिहिली आहे. केंडल आणि काइली यांच्या कादंबरीचे नाव ‘रेबेल्स: सिटी ऑफ इंद्र’ असे आहे. २०१४ मध्ये त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. मात्र, त्यांचे हे पुस्तक फारसे प्रसिद्ध झाले नाही. केंडलच्या अनेक अफेअरच्या बातम्याही अनेकदा चर्चेत असतात.
हायस्कूलच्या काळात तिचे अनेक मुलांशी संबंध होते. याशिवाय फुटबॉलपटू ज्युलियन ब्रूक्स आणि गायक हॅरी स्टाइल्ससह ऍश्टन इर्विनसोबत केंडलच्या अफेअरच्या बातम्या झळकल्या आहेत.
एवढेच नाही, तर केंडलचे नाव प्रसिद्ध गायक जस्टिन बीबरसोबतही जोडले गेले आहे. केंडल आणि जस्टिन नेहमीच एकमेकांना मित्र म्हणून संबोधतात. केंडल जेनर २००७ मध्ये सुरू झालेल्या ‘कीपिंग अप विथ द कार्दशियां’ या रियॅलिटी शोमध्येही दिसली आहे. यासोबतच २०१२ मध्ये ‘हवाई फाइव्ह-ओ’ चित्रपटाच्या एका एपिसोडमध्येही तो दिसला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दोन वर्षाच्या डेटिंगनंतर क्रिस्टन स्टिवर्ट आणि डायलन मेयर या दोघींनी केला साखरपुडा
-‘पावरकपल’ झायन मलिक अन् गीगी हदीद झाले वेगळे, गायकावर सासूने लावले गंभीर आरोप