Monday, July 1, 2024

शूटिंगसाठी एकत्र विमानप्रवास करूनही गौरी आणि हितेन होते एकमेकांसाठी अनोळखी; पुढे ‘अशा’प्रकारे अडकले लग्नबंधनात

कलाकारांची प्रेमकहाणी फार रंजक असते. अनेक कलाकार बरेच दिवस एकत्र काम करूनही एकमेकांबरोबर बोलत नसतात. परंतु ते लग्न गाठीमध्ये अडकतात. यातीलच छोट्या पडद्यावरील आणि सर्वांची आवडती अभिनेत्री गौरी प्रधान होय. तिची प्रेम कहाणी देखील फार मजेशीर आहे. गौरी गुरुवारी (१६ सप्टेंबर) तिचा वाढदिवस साजरा करते. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ तिचा आता पर्यंतचा जीवन प्रवास आणि तिची गोड प्रेमकहाणी.

गौरीचा जन्म जम्मूमध्ये १६ सप्टेंबर, १९७७ रोजी झाला. तिचे वडील सेवानिवृत्त सैन्यअधिकारी आहेत, तर आई गृहिणी आहे. वडिलांच्या नोकरीमुळे तिचे शिक्षण देशभर फिरत पूर्ण झाले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांसह ती पुण्याला स्थायिक झाली. तिने लंडन विद्यापीठाशी संलग्न असलेल्या संस्थेतून मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. कॉलेजमध्ये असतानाच तिने फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला. त्यानंतर तिची अभिनयातील आवड लक्षात घेत ती मुंबईला आली. त्यांनतर तिने मॉडेलिंगमध्ये स्वतःचे नशीब आजमावले.

मॉडलिंगमध्ये नशीब आजमावत असलेल्या गौरीला ‘नूरजहां’ या मालिकेमध्ये साल २००० मध्ये अभिनय करण्याची पहिली संधी मिळाली. त्यांनतर पुढल्याच वर्षी म्हणजे साल २००१मध्ये आलेली मालिका ‘कुटुंब’मध्ये तिने काम केले. तिच्या या मालिकेमधील अभिनयाने तिला घराघरात पोहोचवले. या मालिकेला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली. या मालिकेनंतर छोट्या पडद्यावरील तिच्या अभिनयाने मोठी झेप घेतली. तिने ‘कृष्णा-अर्जुन’, ‘नाम गुम जाएगा’, ‘क्या हादसा क्या हकीकत’, ‘तू आशिकी’ अशा मालिकांसह साल २००४ मध्ये आलेली ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या प्रसिद्ध मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली. तिच्या अभिनयाने तिने या मालिकेमधून ४ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिने ‘किसमें कितना हैं दम’, ‘जोडी कमाल की’, ‘नच बलिये २’, ‘क्या आप पांचवी पास से तेज है’ अशा शोमध्ये देखील काम केले. तसेच ती ‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वात देखील झळकली होती.

गौरीची प्रेमळ प्रेमकहाणी
गौरीने साल २००४ मध्ये हितेन तेजवानी बरोबर विवा केहला. पहिल्यांदा हे दोघे मुंबई विमानतळावर भेटले. दोघेही हैद्राबाद येथील एका शूटिंगला चालले होते. परंतु दोघेही एकमेकांसाठी एवढे अनोळखी होते की, त्यांना माहितच नव्हते ते दोघे एकाच शूटिंगला चालले आहेत. त्यांनी ब्युटी सोपच्या जाहिरातीमध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले. या नंतर ते अनेकवेळा सेटवर एकत्र शूटिंगसाठी आले होते. परंतु शांत आणि एकमार्गी स्वभावाच्या गौरीची हितेनबरोबर कधीच बातचीत झाली नव्हती. त्या दोघांना या गोष्टीची कल्पना देखील नव्हती की, पुढे जाऊन ते एक आदर्श जोडपं बनणार आहेत.

‘या’ प्रसंगामुळे गौरी आणि हितेन आले जवळ
एकदा हितेन काही कारणास्तव आजारी पडला होता. त्यावेळी अभिनेत्रीने त्याची खूप चांगली काळजी घेतली. त्याला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवले. त्यामुळे या दरम्यान त्यांच्यामध्ये जवळीक वाढली. मैत्रीला हळू हळू प्रेमाचा रंग येऊ लागला. त्यानंतर २९ एप्रिल, २००४ मध्ये दोघांनी लग्न केले. हितेनचे हे दुसरे लग्न होते. त्याच्या पहिल्या पत्नीबरोबर त्याचा घटस्फोट झाला होता. या दोघांना दोन जुळी मुलं आहेत.

त्यांची नावे निवान आणि कात्या अशी आहेत. दोघेही आपल्या सुखी संसारामध्ये खुश आहेत. गौरीने साल २००६मध्ये ‘नच बलिए’मध्ये भाग घेतला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप

-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट

-अरबाजने अनिल यांना विचारला सलमानच्या लग्नाचा प्रश्न; अभिनेते म्हणाले, ‘तू तर त्याचा भाऊ आहेस…’

हे देखील वाचा