Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड आदित्य पांचोलीचे वैयक्तिक आयुष्य व्यावसायिकपेक्षा जास्त आहे रंजक, जाणून घ्या त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी

आदित्य पांचोलीचे वैयक्तिक आयुष्य व्यावसायिकपेक्षा जास्त आहे रंजक, जाणून घ्या त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी

आदित्य पांचोली (Aditya Pancholi) हा बॉलिवूडमधील अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. आदित्य हा बॉलिवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे ज्याच्या स्मार्टनेसने मुली घायाळ होत होत्या. आपल्या काळातील सर्वात लोकप्रिय कलाकारांसोबत काम करूनही आदित्य पांचोलीच्या कारकिर्दीला फारशी झेप मिळाली नाही. शाहरुख खानचा ‘येस बॉस’ चित्रपट करून त्याने प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. पण त्याचा प्रभाव फार काळ टिकला नाही. त्याचे आयुष्य वादांनी वेढलेले होते. कंगनापासून तो इतर अनेक अभिनेत्रींपर्यंत त्याचे नाव वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडला. तो सध्या इंडस्ट्रीतून जवळपास गायब आहे. अभिनेता मंगळवारी (४ जानेवारी) त्याचा ५७वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या वादांनी भरलेल्या आयुष्याबद्दल.

आदित्यचा जन्म ४ जानेवारी १९६५ रोजी मुंबईत झाला. आदित्य हा चित्रपट कुटुंबातील होता. सिनेसृष्टीत आल्यानंतर त्याने सहाय्यक अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याने आपल्यापेक्षा ६ वर्षांनी मोठी अभिनेत्री जरीना वहाबशी लग्न केले. आदित्यचा मुलगा सूरज पांचोली आहे. ज्याने सलमान खान निर्मित ‘हीरो’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याला सना पांचोली नावाची मुलगी देखील आहे.

आजही चाहत्यांना आठवते ‘येस बॉस’ची व्यक्तिरेखा
आदित्यच्या सर्वोत्तम कामांपैकी एक म्हणजे ‘येस बॉस’मधील शाहरुख खानच्या बॉसची भूमिका होय. ज्यामध्ये आदित्य खलनायकाच्या भूमिकेत होता. या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. त्याने त्यावेळी आपल्या दमदार अभिनयाने शाहरुख खानला बरोबरी दिली. परंतु त्याचा फारसा फायदा त्याला होऊ शकला नाही. त्याने १९८६ मध्ये ‘सस्ती दुल्हन महंगा दुल्हा’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘महासंग्राम’ या चित्रपटात त्याला महत्त्वाची भूमिका साकारायला मिळाली, त्यानंतर त्याच्या कामाची ओळख झाली.

अनेक सुपरहिट चित्रपटांचा आहे भाग
यानंतर आदित्य इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार बनला. ८० आणि ९० च्या दशकात त्याची कारकीर्द बहरली होती. त्याने बहुतेक चित्रपट सहाय्यक कलाकार म्हणून केले. जेव्हा त्याने मुख्य अभिनेता म्हणून काम केले. तेव्हा त्याच्या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. आपल्या कारकिर्दीत त्याने ‘दयावान’, ‘धर्मयुद्ध’, ‘अमला’, ‘कातिल’, ‘मोहब्बत का पैगाम’, ‘सैलाब’, ‘नामचीन’, ‘विष्णु-देवा’, ‘साथी’, ‘तहलका’, ‘मुकाबला’, ‘सुरक्षा’, ‘जंग’, ‘बागी’, ‘येस बॉस’ आणि ‘तरकीब’ यांसारख्या चित्रपटात काम केले.

वैयक्तिक आयुष्यही राहिले वादग्रस्त
आदित्य पांचोलीचा वादांशी सखोल संबंध आहे आणि तेही अशा वादांशी ज्यापासून प्रत्येकाला दूर राहायचे आहे. आदित्यवर शेजार्‍याला मारहाण करणे, महिलेवर बलात्कार करणे आणि अभिनेत्रींसोबत अफेअर असल्यासारखे आरोप आहेत. आदित्यवर एका अभिनेत्रीवर बलात्काराचा आरोप होता. आदित्यने तिला अं’मली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि मारहाणही केल्याचा आरोप तिने केला होता. इतकंच नाही, तर मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोपही त्याच्यावर होता. एकेकाळी आदित्यचे कंगनासोबत अफेअर असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्यावेळी कंगना आणि आदित्य एकमेकांच्या जवळ होते, नंतर दोघांमध्ये वाद झाला आणि ते वेगळे झाले.

हेही वाचा-

हे देखील वाचा