अवघ्या १७व्या वर्षी वडील बनले होते दारा सिंग, त्यांच्यासोबत काम करताना अभिनेत्रींचा तर उडायचा थरकाप


बॉलिवूड अभिनेते दारा सिंग हे एक लोकप्रिय अभिनेते होते. आज ते या जगात नसले, तरी त्यांच्या कामाच्या रूपाने ते आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. त्यांचे पूर्ण नाव दारा सिंग रंधावा हे आहे. परंतु संपूर्ण जग त्यांना दारा सिंग या नावानेच ओळखते. शुक्रवारी (१९ नोव्हेंबर ) त्यांची जयंती आहे. चला तर जाणून घेऊया त्याचा जीवनप्रवास…

दारा सिंग यांचा जन्म १९ नोव्हेंबर, १९२८ मध्ये अमृतसरमध्ये झाला. लहान असताना त्यांना कुस्तीची खूप आवड होती. त्यांच्या वडिलांचे नाव सुरत सिंग रंधावा आणि आईचे नाव बलवंत कौर हे होते. त्यांच्या आजोबांची अशी इच्छा होती की, त्यांनी शिक्षण घेऊ नये, तर शेतातील कामे करावी. कारण त्यांच्या भावंडांमध्ये ते मोठे होते. खूप कमी वयातच त्यांचे लग्न झाले. जेव्हा ते १७ वर्षाचे होते तेव्हा ते एका मुलाचे वडील होते. नंतर त्यांनी दुसरे लग्न केले. (Birthday special, dara sing become father at the age of senenteen actress afraid to work with him)

लहान असताना त्यांची अंगकाठी खूप चांगली होती. सुरुवातीला गावात होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत ते सहभाग घेत असायचे. नंतर ते हळूहळू एक इंटरनॅशनल पैलवान बनले. असे म्हटले जाते की, त्यांनी त्यांच्या कुस्तीच्या करिअरमध्ये पाचशे पेक्षाही जास्त वेळा कुस्ती खेळली आहे. यातील एकही सामना ते हारले नाहीत. १९५९ मध्ये त्यांनी पूर्व विश्व चॅम्पियन जॉर्ज गारीयान्काला पराभूत केले होते. नंतर १९६८ मध्ये फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये ते विश्व चॅम्पियन बनले. केवळ ५५ व्या वर्षी त्यांनी हे काम करून एक रेकॉर्ड तयार केला.

दारा सिंग यांनी तसे तर अनेक पैलवानांना मैदानात धूळ चारली आहे. परंतु ऑस्ट्रेलियाच्या किंग काँगसोबत झालेला सामना अजूनही चर्चेत आहे. तो सामना कोणीही विसरले नाही. त्यावेळी दारा सिंग यांचे वजन १३० किलो एवढे होते आणि किंग काँग यांचे वजन २०० किलो होते. परंतु तरी देखील दारा यांनी एक फटक्यात त्यांना आडवे पाडले होते. हे पाहून सगळेच हैराण झाले होते.

दारा सिंग यांनी १९५२ साली ‘संगदिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी सम्राट दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यासोबत लग्न केले होते. यानंतर मुख्य भूमिकेत त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. त्यांनी अभिनेत्री मुमताज यांच्यासोबत जवळपास १६ चित्रपटात काम केले. माध्यमातील वृत्तानुसार जेव्हा ते अभिनेते होते, तेव्हा अनेक अभिनेत्री त्यांच्यासोबत काम करण्यास घाबरत होत्या. याचे कारण म्हणजे त्यांचे मजबूत शरीर.

त्यांनी ‘वतन से दूर’, ‘रुस्तम ए बगदाद’, ‘शेरदिल’, ‘सिकंदर ए आजम’, ‘राका’, ‘मेरा नाम जोकर’, ‘करम’ आणि ‘मर्द’ यांसारख्या चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनात खास जागा बनवली. त्यांनी ‘रामायण’मध्ये हनुमानाची भूमिका निभावली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-KBC: शोदरम्यान स्पर्धकाने बिग बींना जया बच्चनबद्दल विचारला ‘असा’ प्रश्न, अभिनेत्याने शो सोडण्याची केली विनंती

-चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य

-‘सूर्यवंशी’मुळे पाकिस्तान त्रस्त! राष्ट्रपतींसह ‘या’ अभिनेत्रीने इस्लामोफोबियाबद्दल व्यक्त केली चिंता


Latest Post

error: Content is protected !!