बॉलिवूडमध्ये अनेक प्रतिभावान गायक आहे, ज्यांनी त्यांच्या आवाजाच्या जोरावर सर्वांना थिरकायला भाग पाडले. त्यांच्या मंत्रमुग्ध आवाजाने संपूर्ण लोकांना त्यांनी त्यांची दखल घ्यायला भाग पाडले. बॉलिवूडचा असाच एक सुरेल गायक म्हणजे ‘केके’ उर्फ ‘कृष्णकुमार कुन्नथ’. केकेने त्याच्या आवाजाने सर्वांनाच त्याचे फॅन केले. आज केके त्याचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. मूळचा साऊथ इंडियन असलेल्या केके चा जन्म दिल्लीमध्ये झाला. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया केके बद्दल अधिक माहिती.
केके चा जन्म २३ ऑगस्ट १९६८ साली दिल्लीमध्ये एका मल्याळम परिवारात झाला. त्याने त्याचे संपूर्ण बालपण दिल्लीमधेच व्यतीत केले. केकेने त्याचे शालेय शिक्षण माउंट सेंट मेरी स्कूलमधून पूर्ण केले तर दिल्लीच्या किरोड़ीमल कॉलेजमधून त्याने त्याची पदवी संपादन केली. त्याच्यावर किशोर कुमार, आर.डी.बर्मन, मायकल जॅक्सन यांच्या गाण्याचा खूप मोठा प्रभाव होता. बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्याने जवळपास ३५०० जिंगल्स गायल्या होत्या. (birthday special know singer kay kay musical journey and his life)
केकेने हिंदीसोबतच तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, मराठी, बंगाली, गुजराती आदी अनेक भाषांमध्ये गाणी गायली. १९९९ साली क्रिकेट वर्ल्डकप दरम्यान त्याने भारतीय टीमला पाठिंबा देण्यासाठी त्याने ‘जोश ऑफ इंडिया’ हे गाणे गायले. या गाण्यात अनेक क्रिकेटर्स देखील दिसले. त्यानंतर त्याने ‘पल’ या म्युझिक अल्बममधून पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.
केके कदाचित एकमेव असा गायक असेल जो कधीही मीडियासमोर स्वतःची पब्लिसिटी करून घेण्यासाठी आला नाही, कधीही त्याचे नाव कोणत्या वादांमध्ये आले नाही. त्याचा फक्त एकच नियम कायम राहिला ‘आपण भलं आणि आपलं कामं भलं.’
मुख्य म्हणजे केकेने त्याची पदवी संपादन केल्यानंतर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून कामं करण्या सुरुवात केली. मात्र त्याला त्याची गाण्याची पॅशन शांत बसू देत नव्हती म्हणून त्याने त्याची नोकरी सोडली आणि पूर्ण लक्ष त्याने गाण्यावर केंद्रित केले. गणयत करियर करण्यासाठी त्याने मुंबई गाठली. पुढे त्याने लेस्ले लुईस सोबत मिळवून ‘पल’ हा अल्बम तयार केला. हा अल्बम तुफान गाजला. याच अल्बमने त्याला लोकप्रियता आणि प्रसिद्धीसोबतच बॉलिवूडची दारं उघडी करून दिली.
बॉलिवूडममध्ये केकेला सर्वात मोठा ब्रेक मिळाला. त्याने संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमात त्याने ‘तडप तडप’ हे गाणे गायले आणि रातोरात केके प्रसिद्ध झाला. या गाण्याने त्याला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्याने ‘यारों’, ‘पल’, ‘कोई कहे कहता रहे’, ‘मैंने दिल से कहा’, ‘आवारापन बंजारापन’, ‘दस बहाने’, ‘अजब सी’, ‘खुदा जाने’,’दिल इबादत’, ‘तू ही मेरी शब है’, ‘बर्दशात नही कर सकता’, ‘झरा सी’ आदी अनेक एका पेक्षा एक सरस गाणी गायली.
केके च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वळायचे झाले तर त्याने १९९१ साली त्याची बालमैत्रीण असलेल्या ज्योती कृष्णासोबत लग्न केले. त्याला दोन मुलं आहेत. केकेने टेलिव्हिजनवर देखील अनेक रियॅलिटी शोचे सूत्रसंचालन केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज