Wednesday, July 3, 2024

‘तेव्हा मला फक्त हृदयविकाराचा झटका येणे बाकी होते’, म्हणत लारा दत्तने केला होता मुलीबद्दल ‘तो’ खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. चित्रपटांमध्ये कमी दिसूनही तिची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान लाराने तिची चार वर्षांची मुलगी असलेल्या सायराबाबत एक धक्कादायक खुलासा केला होता. तिच्या खुलाशांमध्ये लाराने सांगितले आहे की, घटस्फोट म्हणजे काय हे तिच्या मुलीला इतक्या लहान वयातच माहित होते. ‘फ्रेंड्स’ हा प्रसिद्ध शो पाहताना तिचा पती महेश भूपतीने सायराला घटस्फोटाचा अर्थ शिकवल्याचा खुलासाही लाराने केला. ‘फ्रेंड्स’ हा शो तिच्या मुलीचा आणि नवऱ्याचा आवडता शो आहे. लारा आणि महेश यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते. २०१२ मध्ये दोघांनी मुलगी सायराचे स्वागत केले. आज सायरा १० वर्षांची झाली आहे.

माध्यमांशी बोलताना लाराने खुलासा केला की, “महेशचा आवडता शो ‘फ्रेंड्स’ आहे आणि सायरा फक्त चार वर्षांची असल्यापासून ती तिच्या वडिलांसोबत हा शो पाहत होती.” लारा पुढे सांगते की, “एक दिवस सायरा माझ्याकडे आली आणि एक गेम खेळत असताना मला म्हणाली की, आई मी इथे राहते, हे माझे घर आहे. ते तुझे घर आहे आणि माझा घटस्फोट झाला आहे. हे ऐकून मला जवळजवळ हृदयविकाराचा झटका येण्याचा बाकी राहिला होता. तिचे बोलणे ऐकून मी अवाक झाले आणि तिला विचारले, काय बोलतेयस? तुला हे कोणी सांगितले? घटस्फोट म्हणजे काय? तेव्हा ती मला म्हणाली, अग, जेव्हा दोन लोकांचे वैवाहिक जीवन वाईट असते आणि ते जुळत नाहीत, तेव्हा ते वेगळे राहू लागतात. याचा अर्थ त्यांचा घटस्फोट होतो. ती पाच वर्षांची होणार होती आणि तिच्या तोंडून या गोष्टी ऐकून मला धक्काच बसला. मी माझ्या मुलीला विचारले की, तिला याबद्दल कोणी सांगितले आणि सायरा म्हणाली, डॅडीने.”

लारा पुढे सांगते की, तिने महेशला फोन करून मुलीच्या बोलण्याची पुष्टी केली आणि त्याला विचारले की, त्याने इतक्या लहान वयात या गोष्टी का सांगितल्या. यावर महेश हसला आणि म्हणाला, “आम्ही ‘फ्रेंड्स’ एकत्र पाहत होतो आणि सायराला जाणून घ्यायचे होते की, रॉसने तीन लग्न का केले?” लारा म्हणाली की, “म्हणून तू तिला सांगितलेस घटस्फोटाचा अर्थ काय? आपण असे पालक आहोत.”

शनिवारी (१६ एप्रिल) रोजी लारा तिचा ४४ वा वाढदिवस साजरा करत असून, लग्न आणि आई झाल्यानंतर लाराने अभिनय करणे कमी करत तिच्या घराला आणि मुलीला प्राधान्य देण्याचे ठरवले. सध्या लारा चित्रपटांमध्ये कमी तर ओटीटी माध्यमावर जास्त दिसते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा