Saturday, July 6, 2024

लॉरेन गॉटलीब वाढदिवस :भोजपुरी सिनेसृष्टीत धुमाकूळ घालतेय अमेरिकन डान्सर,असा आहे प्रेरणादायी प्रवास

भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत, जे परदेशातील आहेत, पण ते हिंदी चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी आपली मातृभूमी सोडून मुंबईत आले. त्यापैकीच एक म्हणजे नृत्यांगना आणि अभिनेत्री लॉरेन गॉटलीब. जी मूळची अमेरिकेची असून तिने भोजपुरी सिने जगतात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. बुधवार ( ८ जून) लॉरेन  तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. लॉरेनचा जन्म 8 जून 1988 रोजी अमेरिकेतील ऍरिझोना येथे झाला. अभिनेत्री होण्यापूर्वी ती एक उत्कृष्ट डान्सर होती. लॉरेनने अनेक आंतरराष्ट्रीय सुपरस्टार्ससोबत काम केले आहे, परंतु तिने आपल्या डान्सने भोजपुरी चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रियता मिळवली. जाणून घेऊया तिच्या प्रवासाबद्दल.  

लॉरेनने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी नृत्य शिकण्यास सुरुवात केली. ती हिप-हॉप, टॅप डान्स, बेली डान्स यासह विविध प्रकारचे नृत्य शिकली. लॉरेनने एकदा अमेरिकन डान्सवर आधारित रिअलिटी शो ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’मध्ये भाग घेतला होता. ज्यामध्ये तिने रिहाना, शकीरा, विल स्मिथ अशा अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले. नृत्यासोबतच लॉरेनने अमेरिकेतच अभिनय जगतात प्रवेश केला. ती ‘डिझास्टर’, ‘हेना मोंटाना’ सारख्या चित्रपटातही दिसली आहे.लॉरेनने तिच्या बॉलीवूड करिअरची सुरुवात 2013 मध्ये आलेल्या ABCD चित्रपटातून केली, ज्यामध्ये ती गणेश आचार्य, प्रभू देवा, पुनीत पाठक आणि सलमान युसूफ यांसारख्या नर्तकांसोबत दिसली.

तत्पुर्वी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अभिनेत्रीला हिंदी भाषेवर काम करावे लागले. तिने आपले तीन महिने फक्त हिंदी शिकण्यात घालवले होते. लॉरेन ‘घोस्ट व्हिस्परर’, ‘ABCD’, ‘ABCD 2’, ‘वेलकम टू कराची’ मध्ये दिसली आहे. याशिवाय ती अनेक रिअलिटी शोमध्ये पाहुणी म्हणूनही दिसली आहे. लॉरेन गॉटलीब भोजपुरी इंडस्ट्रीतील एका गाण्यात दिसली आहे, ज्याचे नाव आहे ‘कमरिया हिला रही है’. या गाण्यात लॉरेन आणि भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग यांची जोडी दिसली होती आणि गाण्याने येताच यूट्यूबवर धुमाकूळ घातला होता. हे गाणे अवघ्या तीन दिवसांत 1.7 कोटींहून अधिक वेळा पाहिले गेले आणि आतापर्यंत हे गाणे 9.8 कोटींहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. हे गाणे पवन सिंग आणि भोजपुरी गायिका पायल देव यांनी गायले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हेही वाचा-

लव्हस्टोरी: राजेश खन्नांवरील आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी डिंपल यांनी फेकून दिली होती ऋषी कपूर यांची ‘ती’ भेट

तर ‘या’ कारणामुळे डिंपल कपाडिया यांनी लग्नाच्या २७ वर्षांनंतरही राजेश खन्नांना नव्हता दिला घटस्फोट

सलमान खानच्या गाण्यांची जादू परदेशातही! ‘चुनरी चुनरी’ गाण्यावर नाचताना दिसली इटालियन नवरी

हे देखील वाचा