Thursday, April 17, 2025
Home कॅलेंडर वजन वाढविण्यासाठी एकावेळी तब्बल ४० अंडी खायचा प्रभास, ‘बाहुबली’साठी २०० कोटींच्या ऑफरलाही केलं बाय बाय

वजन वाढविण्यासाठी एकावेळी तब्बल ४० अंडी खायचा प्रभास, ‘बाहुबली’साठी २०० कोटींच्या ऑफरलाही केलं बाय बाय

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास त्याच्या चित्रपटांमध्ये ऍक्शनसाठी ओळखला जातो. त्याचा ‘बाहुबली’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. एवढेच नाही, तर या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रमही मोडले आहेत. पण आपल्या ऍक्शनसाठी ओळखला जाणारा प्रभास, खऱ्या आयुष्यात मात्र खूपच शांत माणूस आहे. विशेष गोष्ट अशी की, आज प्रभास ज्याप्रकारे आपला स्वभाव आणि मजबूत शरीरासाठी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे, तो कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तसा नव्हता.

भारतीय चित्रपटसृष्टीचा ‘बाहुबली’ प्रभास23 ऑक्टोबरला त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रभासचा जन्म मद्रास (तामिळनाडू) येथे 1979 मध्ये झाला होता. त्याचे खरे नाव वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पालपती आहे, जे अर्थातच जास्त लोकांना माहिती नसेल. प्रभासच्या अभिनयाचे लाखो चाहते वेडे आहेत. या अभिनेत्याने आपल्या करिअरची सुरुवात साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून केली होती, पण सध्या तो बॉलिवूडचाही सुपरस्टार बनला आहे. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्याबद्दल मनोरंजक गोष्टी जाणून घेऊयात. (birthday special prabhas has put on his weight by 30 kg for film baahubali)

चित्रपटासाठी वाढवलं होतं वजन
प्रभासचा ‘बाहुबली’ हा चित्रपट दोन भागांमध्ये रिलीझ झाला होता. या चित्रपटातील प्रभासचा ‘रफ ऍंड टफ’ लूक चांगलाच पसंत केला गेला होता. पण फार कमी लोकांना माहित असेल की, अभिनेत्याने या चित्रपटासाठी 30किलो वजन वाढवले ​​होते. प्रभास आपले वजन वाढवण्यासाठी दररोज 40 अंडी खात असे. एवढेच नाही तर तो दररोज 5 ते 6 तास जिमही करत असे.

‘बाहुबली’साठी नाकारली 200 कोटींची ऑफर
आजच्या काळात प्रत्येक अभिनेता एकाच वेळी दोन किंवा चार चित्रपटांचे शूटिंग करतो. पण प्रभास एका वेळी एकच चित्रपट शूट करतो. प्रभासच्या ‘बाहुबली’ चित्रपटाचे शूटिंग तब्बल 5 वर्षे चालले. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याला इतर कोणताही प्रोजेक्ट घ्यायचा नव्हता. या कारणास्तव, त्याने200 कोटींची ऑफरही नाकारली. एवढेच नाही, तर त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांनाही नकार दिला होता.

‘बाहुबली’साठी घेतलंय बक्कळ मानधन
बाहुबली चित्रपट २५० कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. महत्वाची बाब म्हणजे, चित्रपटाच्या संपूर्ण बजेटच्या 10टक्के म्हणजेच 24 कोटी प्रभासला देण्यात आले. या भूमिकेसाठी बॉडी तयार करण्यासाठी प्रभासने जिमवर 1.5 कोटी रुपये खर्च केले होते.

लाजाळू आहे स्वभाव
प्रभासचा स्वभाव खूपच लाजाळू आहेत. तो कमी बोलणे पसंत करतो. त्याचा हा स्वभाव अनेकदा चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही पाहायला मिळतो, जो चाहत्यांना खूप आवडतो.

हेही नक्की वाचा-
‘राज ठाकरे हे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे’; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
साईड कट ड्रेसमध्ये किलर दिसतेय ‘दगडी चाळ’ची ‘सोनल’; पाहा फोटो

हे देखील वाचा