Sunday, August 10, 2025
Home बॉलीवूड वर्षातून दोनवेळा वाढदिवस साजरा करतो अभिनेता रोहित रॉय, कारण ऐकुन तर तुमच्याही उंचावतील भुवया!

वर्षातून दोनवेळा वाढदिवस साजरा करतो अभिनेता रोहित रॉय, कारण ऐकुन तर तुमच्याही उंचावतील भुवया!

सिनेसृष्टीसह, मालिकांमध्ये रसिक प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची छाप उमटवणारा अभिनेता रोहित रॉय शनिवारी त्याचा वाढदिवस साजरा करतो. त्याने छोट्या आणि मोठ्या पडद्यावर समान पद्धतीने आपल्या अभिनयाचा झेंडा रोवला आहे. ‘गाता रहे मेरा दिल’ पासून ते ‘संजीवनी वर्धन’पर्यंत त्याने अनेक अभिनयाच्या छटा साकारल्या आहेत.

रोहितचा जन्म साल १९६८ मध्ये झाला. त्याचे बालपण अहमदाबादमध्येच गेले. त्याने शालेय शिक्षण अहमदाबादच्या सेंट झेवियर्स स्कूलमधून पूर्ण केले. तसेच सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले. (Birthday special rohit Roy Celebrate in twice in a year know the reason)

दोन वेळा साजरा करतो जन्मदिवस
आपल्या सर्वांना माहीत असलेली अभिनेत्याची जन्म तारीख चुकीची आहे. खरं तर त्याचा वाढदिवस ५ एप्रिलला असतो. त्याचे कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्ती त्याला याच दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. परंतु विकिपीडियावर त्याची जन्म तारीख २ ऑक्टोबर आहे. त्यामुळे त्याचे चाहते आणि अन्य व्यक्ती त्याला या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. या विषयी त्याला काहीच त्रास नाही. त्याने ही तारीख बदलण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने असे म्हटले आहे की, “बापूजींची जयंती याच दिवशी असते. त्यांच्या विचारांचे मी अनुकरण करतो. त्यामुळे मला छान वाटते की, माझा वाढदिवस या दिवशी देखील साजरा केला जातो. गांधीजींच्या जयंतीला माझ्या घरी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा येतात, यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजतो. म्हणूनच मी ही तारीख कधी बदलण्याचा प्रयत्न देखील केला नाही. मला हा संभ्रम आवडतो.”

अभिनेत्यासह आहे व्हॉईस आर्टिस्ट
रोहित अभिनायमध्ये तर पारंगत आहेच, यासह तो एक व्हॉईस आर्टिस्ट म्हणून देखील काम करतो. त्याने आतापर्यंत अनेक हॉलिवूड चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. त्याने अभिनेता क्रिस पॅंटच्या हिंदी डब चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. यामध्ये ‘एवेंजर्सः इन्फिनिटी वॉर’, ‘एवंजर्सः एन्डगेम’ आणि ‘गार्जियन ऑफ गॅलेक्सी’ या चित्रपटांचा समावेश आहे.

साल १९९९ मध्ये त्याने अभिनेत्री मानसी जोशी बरोबर विवाह केला. या दोघांची जोडी देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांना या दोघांना एकत्र पाहणे खूप आवडते. या दोघांना एक मुलगी देखील आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडमध्ये तयार झाले गांधीजींच्या विचारांचं दर्शन घडविणारे चित्रपट, एकावर तर पाकिस्तानने घातली होती बंदी

-‘मला खुश राहायचंय’, म्हणत घराच्या छतावर पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसली ‘स्वीटू’

-लग्नाच्या पहिल्या रात्रीच अक्षय कुमारला समजलं होतं पत्नी ट्विंकलचं ‘हे’ सत्य, अभिनेत्याने सर्वांसमोर केला खुलासा

हे देखील वाचा