टेलिव्हिजन, चित्रपट आणि क्रिकेट अशा तिन्ही जगतात नाव कमावलेला अभिनेता म्हणजे समीर कोचर. समीरने त्याच्या टॉल, डार्क, हँडसम आणि फिट लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. आज समीर त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया समीरबद्दल अधिक माहिती.
समीरचा जन्म २३ मे १९८० साली दिल्लीमध्ये झाला. त्याने त्याच्या करियरची सुरुवात दूरदर्शचा एड्स जनजागृतीवरील कार्यक्रम असणाऱ्या “हाथ से हाथ मिला” या शो पासून केली. या शोमध्ये समीरने सुगंधा गर्गसोबत सूत्रसंचालन केले होते. तर बॉलिवूडमध्ये त्याने ‘जहर’ या सिनेमातून पदार्पण केले. तर टीव्हीवर अभिनयात पदार्पण ‘डेंजरस’ पासून केले.
View this post on Instagram
समीरने त्याच्या लहान मोठ्या सर्वच कामांमधून प्रेक्षकांवर छाप पाडत आपली ओळख निर्माण केली. त्याच्या प्रतिभेमुळे आज त्याने स्वतःचे प्रेक्षक आणि फॅन्स निर्माण केले आहे. आपल्या अभिनयासोबतच त्याने त्याच्या लुक्सने चांगलीच वाहवा मिळवली. आज समीर कोचर हे नाव सगळ्यांच्याच परिचयाचे झाले आहे. समीरने जहर सिनेमात ‘सीन वर्गीस’ ही भूमिका साकारली होती.
समीरने टीव्हीवर बड़े अच्छे लगते हैं, टेस्ट केस, जियो धन धना धन, पवित्र खेल, टाइपराइटर, फोर मोर शॉट्स प्लीज आदी अनेक टीव्हीवरील प्रोजेक्टसमध्ये काम केले. यासोबतच त्याने जहर, बोल्ड, एक से मेरा क्या होगा, जन्नत, चिंताकायला रवि, द मोल, हाइड एंड सीक, चेज, सर्वाइवर इंडिया, डेंजरस इश्क, आइलैंड सिटी, हाउसफुल ३ आदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
रुचिका ओबेरॉय यांच्या ‘आईलैंड सिटी’मध्ये त्यांनी काम केले. या सिनेमाला व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये खूपच कौतुक मिळाले. याशिवाय समीर सेलिब्रिटी क्रिकेट लीग टीमचा भाग होता. याशिवाय त्याने अनेक क्रिकेटच्या सामन्यांचे आयपीएल सामन्यांचे सूत्रसंचालन देखील केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी मृत्यू, घराच्या बाथरूममध्ये सापडला मृतदेह
विवाहित असतानाही रसिका अन् सुयाेगने केला ‘ताे’ किस सीन; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला…’