बाॅलिवूडमध्ये अनेक किंबहुना सर्वच कलाकार हे मुख्य भूमिका साकारण्याचा उद्देशानेच येत असतात. मात्र सर्वांनाच या मुख्य भूमिका मिळतात असे नाही. काही कलाकार सहाय्यक भूमिका आणि सोबतच टेलिव्हिजन करूनही प्रसिद्ध होतात. असाच एक अभिनेता समीर सोनी. फॅशन चित्रपटात काम केलेल्या समीरने सिनेसृष्टीमधे त्याचे बऱ्यापैकी प्रस्थ निर्माण केले आहे. याशिवाय त्याने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका देखील साकारल्या. समीरला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका करत त्याची छाप प्रेक्षकांवर सोडली. आज (२९ सप्टेंबर) समीर त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती
समीरचा जन्म २९ सप्टेंबर १९६८ साली झाला. त्याला सुरुवातीपासूनच या ग्लॅमर जगाचे खूप आकर्षण होते. त्याने त्याच्या वडिलांना मनातील इच्छा बोलून दाखवली. मात्र त्याच्या वडिलांनी त्याला या क्षेत्रात येणास नकार दिला. समीर हुशार असल्याने त्याने नीट अभ्यास करावा आणि वेगळ्या क्षेत्रात करिअर करावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्याने प्रयत्नांनी वडिलांची परवानगी मिळवली आणि तो या क्षेत्रात आला. त्याने ‘समंदर’ मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली. पुढे तो १९९६ साली ‘माऊथहोल ऑफ स्काय’ मध्ये दिसला. त्यानंतर त्याने १९९८ साली ‘चायना गेट’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या ‘बागबान’ सिनेमात झळकला. त्याने सोनी चॅनेलवरच्या सुपरहिट शो ‘जस्सी जैसी कोई नही’ मध्ये देखील भूमिका केली.
समीरने टीव्हीवरील सर्वात विवादित शो असणाऱ्या ‘बिग बॉस’च्या २०१० साली झालेल्या चौथ्या पर्वात सहभाग घेतला होता. शोमध्ये तो १३ आठवडे राहिला. २०१३ साली त्याने एकता कपूरच्या ‘परिचय’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली. समीरने ‘लज्जा’, ‘कभी तुम कभी हम दिल क्या चाहता है’,‘कुमकुम’, ‘विवाह’, ‘फॅशन’, बस्ती, ‘आय हेट लव स्टोरी’ आणि ‘चॉक एन डस्टर’ सारख्या चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या. समीरने अभिनयासोबत दिग्दर्शकाचीही भूमिका बजावली. त्याने ‘माई बर्थडे सॉन्ग’ हा चित्रपट बनवला. समीरने १९९६ साली त्याची गर्लफ्रेंड राजलक्ष्मी खानविलकरशी लग्न केले. परंतु, त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. केवळ सहा महिन्यातच त्यांचा घटस्फोट झाला.
नफीसा जोसेफला डेट करत होता. ते दोघे एका फॅशन शोमध्ये भेटले होते. २००३ साली ‘बागबान’ चित्रपटात समीरने अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारली. सुरुवातीला तो खलनायक म्हणून काम करण्यास तयार नव्हता. परंतु, त्या चित्रपटात अमिताभ बच्चन असल्यामुळे त्याने ती भूमिका साकारली. आणि तो चित्रपट प्रचंड हिट झाला. त्यानंतर तो बरेच दिवस बेरोजगार झाला होता. २०१० साली त्याने ‘बिग बॉस ४’च्या पर्वता प्रवेश केला. त्या शोमध्ये तो १३आठवडे राहिला.
पुढे समीरच्या आयुष्यात नफीसा जोसेफ आली, आणि त्याने तिला डेट करायला सुरुवात केली. ते दोघे एका फॅशन शोमध्ये भेटले होते. या दोघांनी साखरपुडा देखील केला, पण दुर्दैवाने त्यांचे नाते तुटले. मग त्याने नीलम कोठारीशी लग्न केले. आज त्यांना एक मुलगी असून, ते त्यांचे सुखी जीवन जगत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल
–बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम