Wednesday, July 3, 2024

‘तब्बल १५ लोकांसमोर न्यूड सीन दिल्यानंतर मला…’, अल्लू अर्जूनच्या ‘या’ अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉल ही तिच्या बोल्ड अदांनी नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करत असते. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे बिकिनी बोल्ड लूकमुळे ती अनेकदा चर्चेचा विषय बनते. त्यामुळे अनेकवेळा तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. अमला सोमवारी (२६ ऑक्टोबर ) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग इंडस्ट्रीमधील या सगळ्यात हॉट आणि बोल्ड अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया.

अमलाचा जन्म २६ ऑक्टोबर १९९१ रोजी झाला. तिने ‘हेब्बुल’ या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या नंतर ती अनेक चित्रपटात काम करून नावारूपाला आली आहे. तिने एकदा या गोष्टीचा खुलासा केला होता की, तिला १५ लोकांसमोर न्यूड सीन द्यावा लागला होता. एवढंच काय तर तिला स्कीन कलरचा कॉस्च्युम घालायला देखील नकार दिला होता. (Birthday special, sauth actress amla Paul comes in limelight from intimate scene on front of 15 persons)

अमला पॉलने ‘अदाई’ या चित्रपटात एक न्यूड सीन देऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तिच्या या सीनची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा चालू होती. काहीजण तिच्या हिमतीचे खूप कौतुक करत होते. तिच्या या सीनमुळेच ती लाईमलाईटमध्ये आली होती.

अभिनेत्रीने सांगितले होते की, ती या न्यूड सीनमुळे खूप नर्व्हस झाली होती. तिला हे देखील माहित नव्हते की, सेटवर काय होणार आहे आणि कोणकोणते लोक उपस्थित असणार आहेत. तिच्या सुरक्षेबाबत देखील अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते.

यावेळी अमलाने दिग्दर्शक रत्ना कुमार यांना स्पेशल कॉस्च्युम घालण्याबाबत विचारले तेव्हा त्यांनी या गोष्टीला नकार दर्शवला होता.

अभिनेत्रीने खुलासा केला होता की, ज्या दिवशी तिचा हा न्यूड सीन होता त्यावेळी सेटवर केवळ १५ लोकं उपस्थित होती. या सीनसाठी तिने क्रू मेंबरवर खूप विश्वास ठेवला होता. अमलाने सांगितले की, या नंतर तिने चित्रपटातील करिअर सोडून देण्याचा देखील विचार केला होता.

तिला या गोष्टीची काळजी वाटत होती की, यानंतर तिला चांगला चित्रपट मिळेल की नाही. तिचा ‘अदाई’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात एक बलात्कार पीडित महिला न्याय मागण्यासाठी जो संघर्ष करते तो या चित्रपटातून दाखवला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Oscar 2022 : भारताकडून ‘कुंझागल’ या तमिळ चित्रपटाचा ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश

-‘या’ दाक्षिणात्य कलाकारांनी नाकारल्या बॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांच्या ऑफर, पाहा यादी

-आर माधवच्या मुलाला स्विमिंगमध्ये मिळाले तब्बल ७ राष्ट्रीय पुरस्कार, सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव

हे देखील वाचा