Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड BIRTHDAY SPECIAL: कायम आठवणीत राहतील अशा शेफाली शाहच्या 5 संस्मरणीय भूमिका, पाहाच यादी

BIRTHDAY SPECIAL: कायम आठवणीत राहतील अशा शेफाली शाहच्या 5 संस्मरणीय भूमिका, पाहाच यादी

शेफाली शाह बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला कमर्शियल चित्रपटाबराेबरच आर्ट चित्रपटही करायला आवडते. ती चित्रपटाच्या बजेटमुळे किंवा विरुद्ध कलाकारांमुळे नाही, तर त्यांच्या कथेने प्रभावित झाल्यामुळे चित्रपट करण्यास प्राधान्य देते. तिने या वर्षात अनेक हिट चित्रपट आणि सीरिज दिल्या आहेत. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, या वर्षी तिने आयुष्यात सर्वाधिक चित्रपट- वेबसीरिज केल्या आहेत. या सर्व चित्रपट आणि वेबसीरिज मधून तिनं आपली दमदार व्यक्तिरेखा दाखवली आहे. शेफालीने तिच्या पात्राने अनेक दिग्गज कलाकारांना टक्कर दिली आहे.

ह्यूमन (Human)
‘ह्यूमन’ ही मेडिकल थ्रिलर मालिका आहे. जी डिस्ने प्लस हॉट स्टारवर जानेवारीमध्ये स्ट्रीम झाली. या मालिकेत कीर्ती कुल्हारी, राम कपूर, विशाल जेठवा यांसारखे टॅलेंटेड कलाकार होते. या मालिकेत शेफाली डॉक्टरच्या भूमिकेत होती. ही सीरिज जिवंत लोकांवर ड्रग टेस्ट करणाऱ्या आणि वैद्यकीय घोटाळे करणाऱ्यांवर आधारित आहे. या मालिकेत शेफाली निगेटिव्ह भूमिकेत होती, ज्याला खूप पसंती मिळाली.

जलसा (Jalsa)
शेफाली शाह आणि विद्या बालनच्या ‘जलसा’ला प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून दाद दिली. चित्रपटात दोन आईंची स्टाेरी दाखवण्यात आली आहे. चित्रपटात शेफाली एका मोलकरणीची भूमिका साकारत आहे, तर विद्या बालन तिची मालकिन  आणि प्रसिद्ध पत्रकार आहे. विद्याच्या कारने शेफालीच्या मुलीचा अपघात हाेताे आणि त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण हाेतात. या चित्रपटासाठी विद्यापेक्षा शेफालीचे जास्त कौतुक झाले.

दिल्ली क्राइम 2 (Dlehi Crime Season 2)
पहिल्या सीझनप्रमाणेच ‘दिल्ली क्राईम सीझन 2’ मध्ये शेफाली शाहने एक दमदार भूमिका साकारली होती. मात्र, सीझन 1 प्रमाणे सीझन 2 लाेकप्रियता मिलवू शकला नाही. पहिल्या सीझनला सर्वोत्कृष्ट नाटकाच्या श्रेणीत आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड मिळाला.

डार्लिंग्स (Darlings)
जलसा, ह्यूमन आणि दिल्ली क्राइममध्ये गंभीर भूमिका साकारल्यानंतर शेफाली शाहने ‘डार्लिंग’मध्ये एक मजेदार आणि दमदार पात्र साकारले. यामध्ये ती आलिया भट्टची आई झाली. या चित्रपटात विजय वर्माही मुख्य भूमिकेत होता. समीक्षक आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाचे आणि त्यातील कलाकारांचे कौतुक केले. आलियासोबत शेफालीची फनी स्टाइलही प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.

डॉक्टर जी (Doctor G)
शेफाली शाहचा यावर्षीचा 5वा प्रोजेक्ट ‘डॉक्टर जी’ होता. या चित्रपटात ती डॉक्टरच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात तिची महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटात शीबा चढ्ढा, आयुष्मान खुराना आणि रकुलप्रीत सिंग सारखे टॅलेंडेट कलाकार होते. समीक्षकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. रकुल शेफालीसमोर फिकी दिसत होती.(web series actre`s`s shefali shah 2022 movies web series human delhi crime 2 doctor g rakulpreet singh darlings alia bhatt)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅकलेस ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा बाेल्ड अंदाज, फाेटाे व्हायरल
सुष्मिता सेन मिस युनिव्हर्स बनण्यामागे इंदिरा गांधीचा हाेता हात, जाणून घ्या काय आहे कनेक्शन

हे देखील वाचा