Friday, November 22, 2024
Home टेलिव्हिजन कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरलेली श्वेता तिवारी अनेक कठीण गोष्टींचा सामना करत झाली अनेकांची ‘प्रेरणा’

कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरलेली श्वेता तिवारी अनेक कठीण गोष्टींचा सामना करत झाली अनेकांची ‘प्रेरणा’

‘बिग बॉस 4’ ची विजेती अभिनेत्री श्वेता तिवारी 4 ऑक्टोबर तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ‘प्रेरणा’ या नावाने ती घराघरात पोहचली ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेने तिच्या अभिनयाला मोठी कलाटणी मिळाली. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. तसेच ‘खतरो के खिलाडी’ मधून तिचा धीट स्वभाव देखील प्रेक्षकांना खूप आवडला.

श्वेताचा जन्म 4 ऑगस्ट 1980 रोजी उत्तर प्रदेशमध्ये झाला. तिने तिचे प्राथमिक शिक्षण मुंबईमधील एसटी इसाबेल्स हाय स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर तिने बुरहानी कॉलेजमधून बी.कॉमची पदवी संपादन केली. अभिनेत्रीला लहानपणापासूनच अभिनयामध्ये करिअर करायचे होते. त्यासाठी तिने खूप मेहनत देखील घेतली आहे.

श्वेताने सर्वप्रथम एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये नोकरी केली. त्यावेळी तिचे वय फक्त 12 वर्षे होते. अभिनयामध्ये नाव कमवण्यासाठी आधी त्याचे शिक्षण घेणे देखील गरजेचे असते. त्यावेळी तिच्या घरची परिस्थिती हालाखीची असल्याने तिने एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करायला सुरुवात केली होती.

श्वेताने साल 1999 मध्ये ‘कलिरे’ या मालिकेमधून अभिनयामध्ये पदार्पण केले. दमदार अभिनयामुळे तिला एकापाठोपाठ एक मालिका मिळत गेल्या. साल 2000 मध्ये ती ‘आने वाला पल’, साल २००१ मध्ये ‘कही किसी रोज’ या मालिकांमध्ये झळकली. परंतु या मालिकांमधून ती फारशी चर्चेत नव्हती. त्यानंतर साल २००१ मध्येच तिला ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत तिने आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ घातली. तिची ही मालिका तब्बल आठ वर्षे चालली. त्यानंतर तिने ‘दोस्त’, ‘कॅण्डी फ्लॉस’, ‘नागिन’, ‘जाने क्या बात हुई’, ‘बालवीर’, ‘बेगूसराय’, ‘हम तुम और थीम’, ‘मेरे डॅड की दुल्हन’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले.

मालिकांमध्ये यशाचे शिखर गाठत असताना तिचे पाय रुपेरी पडद्याकडे देखील वळाले. साल 2004 मध्ये ‘मदहोशी’ या चित्रपटामधून ती पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली. त्यानंतर तिने ‘आबरा का डाबरा’, ‘अपनी बोली अपना देश’, ‘देवरू’, ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला. साल 2012 मध्ये आलेला मराठी विनोदी चित्रपट ‘येड्यांची जत्रा’ मध्ये देखील तिने अभिनय केला आहे.

अभिनयातील तीचे आयुष्य खूप आनंदी आणि मोठी झेप घेणारे ठरले. परंतु तिच्या खाजगी आयुष्यामध्ये ती आजही सुखी नाही. साल 1998 मध्ये तिने अभिनेता राज चौधरी बरोबर लग्न केले. त्यावेळी ती 18 वर्षांची होती. वयाच्या विसाव्या वर्षी तिने एका मुलीला जन्म दिला. परंतु राजा तिच्याबरोबर गैरव्यवहार करत होता. तो रोज तिला मारहाण करायचा. त्यामुळे ती कौटुंबिक हिंसाचाराची बळी झाली होती. नऊ वर्षे संसार केल्यानंतर तिने साल 2007 मध्ये घटस्फोट घेतला.

त्यानंतर तिच्या आयुष्यात अभिनेता अभिनव कोहली आला. तीन वर्षे हे दोघे एकमेकांना डेट करत होते. साल 2013 मध्ये त्यांनी आपली लग्नगाठ बांधली. त्यानंतर साल 2016 मध्ये त्या दोघांना पुत्ररत्न प्राप्त झाले. एका मुलाला जन्म दिल्यानंतर तिला दुसऱ्या पतीकडून देखील कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला. तसेच तो तिच्या मुलीबरोबर देखील गैरवर्तन करत होता. त्यामुळे त्याच्या विरोधात अभिनेत्रीने गुन्हा दाखल केला आणि साल 2019 मध्ये ते दोघे वेगळे झाले.

श्वेता मनाने तशी धीट आहे. तिने ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये तिच्यातील धाडशीवृत्ती सर्वांना दाखवून दिली आहे. नुकतेच ‘खतरो के खिलाडी’ चे 11 वे पर्व संपले. कामाच्या व्यापामुळे ती सध्या खूप कमजोर झाली आहे. तिची तब्येत देखील बरी नसल्याने तिला एका रुग्णालयात दाखल केले गेले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लग्नाची बेडी’मधील ‘सिंधू’ दिसते खूपच HOT अन् ग्लॅमरस
मोठी बातमी! आलिया भट्टला धक्का, पती रणबीरला ईडीने धाडलं बोलवणं, गंभीर प्रकरणात होणार चौकशी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा