Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड ‘सईया’ गाण्यात बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगचा नवा अवतार पाहून तुम्हीही व्हाल बेभान

‘सईया’ गाण्यात बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगचा नवा अवतार पाहून तुम्हीही व्हाल बेभान

‘बॉब बिस्वास’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachcha दिसलेली बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग (Chitrangada Singh) ‘सइया’ या गाण्यात नव्या अवतारात दिसत आहे. विनोद भानुशाली यांच्या हिट्झ या म्युझिक कंपनीने हे गाणे प्रदर्शित केले आहे. गाण्याची थीम बोल्ड आणि गॉथिक ठेवण्यात आली आहे. ज्यामध्ये चित्रांगदाचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.

‘सइया’ हे गाणे असीस कौरने (Asees Kaur) गायले आहे, तर त्याचे संगीत रईस जैन यांनी दिले आहे. या गाण्याचे बोल रईस आणि विकी नागर यांनी लिहिले आहेत. गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये चित्रांगदासोबत ऋषभ चौहान दिसत आहे. चित्रांगदा सिंगलमध्ये दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्युझिक व्हिडिओमध्ये चित्रांगदा घोड्यावर स्वार होताना दिसत आहे. तिच्या गळ्यात साप लपेटलेला आहे, ज्यामुळे म्युझिक व्हिडिओ मेडिवल आणि रस्टिक बनतो.

या गाण्याबद्दल चित्रांगदा सिंग म्हणाली की, “जेव्हा मी ‘सइया’ पहिल्यांदा ऐकले, तेव्हा ते माझ्या मनातच राहिले. त्याचे बिट्स खूप मनोरंजक आहेत. असीस कौरचा आवाज तो आणखीनच मनोरंजक बनवतो. या गाण्याचा आवाज उत्कृष्ट आहे. आम्ही या म्युझिक व्हिडिओद्वारे काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे.”

विनोद भानुशाली हिट्झ म्युझिक म्हणाले की, “हिट्झ म्युझिकच्या सहाय्याने आम्हांला विविध ट्यून समोर आणायच्या आहेत. ‘सइया’ गाण्याचा आवाज आणि सीन खूपच वेगळे आहे. गाण्याच्या चालीपासून ते म्युझिक व्हिडिओपर्यंत सर्व काही खास तयार करण्यात आले आहे. असीस कौरच्या जादुई आवाजाने हे गाणे आणखी चांगले बनवले आहे. त्याचवेळी असीस कौर म्हणाली की, ‘सइया’ हे गाणे खूपच फ्रेश आणि नॉन फिल्मी गाणे आहे. हे गाणे गाताना मला खूप मजा आली. असा प्रयत्न यापूर्वी कधीच झाला नव्हता. हिट्झ म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा