Monday, July 8, 2024

कुठे गायब आहे बॉबी डार्लिंग? अभिनेत्रीने लैंगिकतेवर सोडले मौन; म्हणाली, ‘काम मिळत नाहीये…’

चित्रपट आणि टेलिव्हिजन जगतात बॉबी डार्लिंग (Bobby Darling) हिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉबीने १९९९ मध्ये ‘ताल’ चित्रपटातून पदार्पण केले होते. ती ‘कसौटी जिंदगी के’ ते ‘बिग बॉस’पर्यंत अनेक शोमध्ये दिसली आहे. बॉबी २०१४ पासून पडद्यापासून दूर आहे. ती सध्या कुठे आहे आणि काय करत आहे याची चाहत्यांना नक्कीच चिंता आहे.

वृत्तवाहिनीशी केलेल्या संभाषणात, बॉबीने केवळ इंडस्ट्रीतून गायब होण्याबद्दलच बोलले नाही, तर पण तिच्या लैंगिकतेबद्दल बोल्ड मतही दिले आहे. बॉबी सांगते की, ती गे किंवा ट्रान्सजेंडर नाही, त्यामुळे लोकांनी तिला समजून घेणे आवश्यक आहे. तिच्याकडे काम नसल्याचा खुलासाही अभिनेत्रीने केला आहे. (bobby darling says she is not a gay or a transgender actress reveals she has no work)

पंकज शर्मापासून बनली पाखी
बॉबीचा जन्म १० जानेवारी १९७४ रोजी दिल्लीत झाला. तेव्हा तिचे नाव होते पंकज शर्मा. बॉबीने आपले रूप बदलले, नाव बदलले आणि आपली ओळख जगासमोर उघड केली. ती LGBTQ अधिकारांबद्दल स्पष्टपणे बोलत असते. २०१४ मध्ये ‘हसी तो फसी’ आणि ‘द सॅटरडे नाईट’ या चित्रपटांमध्ये ती शेवटची पडद्यावर दिसली होती. त्याच वर्षी ती टीव्हीवर ‘ससुराल सिमर का’मध्येही दिसली होती. बॉबी सांगते की, ती सध्या दिल्लीत तिच्या आई-वडिलांसोबत आहे. ती इंडस्ट्रीपासून नक्कीच दूर आहे, पण तिने आपले काम सोडलेले नाही. बॉबी सांगते की, तिच्याकडे सध्या काम नाही आणि ती ते शोधत आहे.

‘बघून हसतात लोक’
बॉबी पुढे सांगते की, आता ट्रान्सवुमन आणि एलजीबीटीक्यू कम्युनिटीला समाजात मान्यता मिळाली आहे, पण तरीही ती फक्त ९० टक्के आहे. आजही ती मॉलमध्ये जाते किंवा घराबाहेर पडते तेव्हा लोक तिच्यावर हसतात. ती म्हणते, “त्यांना माहीत नाही की मी आता स्त्री आहे. त्यांना वाटते की मी गे किंवा ट्रान्सजेंडर आहे. मी त्यांच्यापैकी कोणी नाही हे लोकांना समजून घ्यावे लागेल.”

‘काम नाही, पण आर्थिक अडचणही नाही’
बॉबीला विचारण्यात आले की, काम न मिळाल्याने तिला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे का? ती म्हणाली, “नाही, मी माझे पैसे वाचवले म्हणून नाहीये. देव माझी काळजी घेत आहे. आता मी एक पूर्ण स्त्री बनले आहे.”

‘अजून झाला नाही पतीसोबत घटस्फोट’
बॉबी डार्लिंगने २०१५ मध्ये भोपाळस्थित बिझनेसमॅन रमणिक शर्मासोबत लग्नाची घोषणा केली होती. फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांचे लग्नही झाले. पण एका वर्षानंतर २०१७ मध्ये दोघांचे नाते तुटले. बॉबी डार्लिंगने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. तिने पतीवर फसवणूक, हिंसा आणि अनैसर्गिक सेक्सचे आरोप केले. कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपाखाली तिच्या पतीला अटकही करण्यात आली होती. बॉबी सांगते की, त्यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. तसेच ती आता पतीशी बोलत नाही. दोघांमधील संभाषण आता वकिलांच्या माध्यमातून होत असते.

लिव्ह इनमध्ये राहण्यास आहे तयार
बॉबीला विचारण्यात आले की, तिला पुन्हा लग्न करायचे आहे का? याच्या उत्तरात ती म्हणाली, लग्न नाही, पण ती कुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकते. यावर तिचा काहीही आक्षेप नसल्याचे तिने सांगितले.

हेही वाचा :

हे देखील वाचा