Monday, February 26, 2024

‘अ‍ॅनिमल’मधील लग्नातल्या ‘त्या’ सीनवर वाद वाढताच बॉबी देओलने तोडले मौन, म्हणाला- ‘मला काही…’

गेल्या दहा दिवसांपासून सोशल मीडियावर, थेटरमध्ये आणि चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे ‘अ‍ॅनिमल‘ या सिनेमाची. या सिनेमात बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल आणि रणबीर कपूर यांनी जबरदस्त काम केले आहे. त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलच्या नवीन सिनेमा “अ‍ॅनिमल”मधील त्याच्या लग्ना नंतरच्या सीनवरून मोठा वाद सुरू झाला आहे. या चित्रपटातील त्याच्या वैवाहिक बलात्काराच्या दृश्याबाबत बरेच वाद होत आहेत. या दृश्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे. एका मुलाखतीत बॉबीने यावर मौन सोडले आहे.

या सीनबद्दल बॉबी देओलने (Bobby Deol) आता आपलं मत व्यक्त केलं आहे. दिलेल्या मुलाखतीदरम्यान बॉबीने सांगितले की, “हा सीन चित्रित करताना मला जराही संकोच वाटला नाही. तो म्हणतो, “मी ते पात्र साकारत होतो जो क्रूर आहे, जो एक दुष्ट माणूस आहे आणि तो आपल्या स्त्रियांना अशी वागणूक देतो, तो तसाच आहे. आणि मी ते तसेच चित्रित केले आहे. तो त्याच्या तीन बायकांसोबत खरोखर रोमँटिक होता.”

बॉबी पुढे म्हणतो की, “मला माहित होतं की हा सीन खूप बोल्ड आहे, पण मी तो चित्रित करण्यास तयार होतो. मी माझ्या पात्राची पूर्ण तयारी केली होती आणि मी त्यात पूर्णपणे गुंतून गेलो होतो. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचा संकोच वाटला नाही.” बॉबीच्या या वक्तव्यांची सोशल मिडियावर चर्चा आहे. काही लोक बॉबीच्या भूमिकेची प्रशंसा करत आहेत, तर काही लोक त्याला टीका करत आहेत.

“अ‍ॅनिमल” हा सिनेमा गेल्या दहा दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.’अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor), बॉबी देओल, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 22 जुलै 2023 रोजी रिलीज झाला होता. (Bobby Deol comments on that wedding scene in Animal)

आधिक वाचा-
राघव चढ्ढाच्या पावलावर पाऊल ठेवत परिणीती चोप्रा करणार राजकारणात प्रवेश? अभिनेत्रीने सोडले मौन
‘या’ कारणामुळे अमिताभ बच्चन आहेत निराश, स्वतः पोस्ट करून केला खुलासा

हे देखील वाचा