बॉलिवूडमध्ये हीमॅन धर्मेंद्र आणि अनेक दशकं राज्य केले. अतिशय हँडसम, डॅशिंग, आकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या धर्मेंद्र यांच्या प्रेमात असंख्य तरुणी पडायच्या. जसा जसा काळ पुढे सरकला तसे धर्मेंद्र यांच्या मुलांनी सनी देओल आणि बॉबी देओल यांनी देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सानी देओलला त्याच्या करिअरमध्ये मोठे यश मिळाले आणि एक्शन हिरो म्हणून तो नावारूपास आला. मात्र बॉबीला प्रतिभा असूनही अपेक्षित यश मिळाले नाही. कदाचित चुकीच्या चित्रपटांची निवड हे देखील त्याचे करिअर फ्लॉप होण्याचे कारण असावे.
बॉबीने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र तो सुपरस्टार किंवा यशस्वी अभिनेता ही ओळख मिळवण्यापासून वंचित राहिला. पण म्हणतात ना एक दिवस नक्कीच आपला असतो. असेच काहीसे बॉबीच्या आयुष्यात घडले. सध्याचा ओटीटी काळ बॉबीच्या आयुष्यात एक नवीन अशा घेऊन आला आणि त्याने एकापेक्षा एक सरस वेबसिरीज आणि चित्रपटांमध्ये काम करत तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. खऱ्या अर्थाने आता बॉबीला त्याचा सूर गवसला.
सध्या करिअरच्या चांगल्या ठिकाणी असलेला बॉबी सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय आहे. त्याने नुकताच त्याचा एक थ्रो बॅक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तब्ब्ल २३ वर्ष जुना असून एका चित्रपटाच्या सेटवरचा आहे. या व्हिडिओमध्ये बॉबी त्याचा भाऊ असलेल्या सनी देओलसोबत दिसत आहे. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल्लगी’ या सिनेमाच्या सेटवरच्या या व्हिडिओमध्ये बॉबी आणि सनी चांगलीच मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत बॉबीने कॅप्शनमध्ये लिहिले, “आजच सापडला. अविस्मरणीय आठवण बॉब. दिल्लगी थ्रोबॅक.” या व्हिडिओमध्ये सनी देओल आणि बॉबी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरसोबत मस्ती करताना दिसत असून, आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तत्पूर्वी बॉबी देवोलचे खरे नाव विजय सिंग देओल आहे. ५५ वर्षीय बॉबीने १९९५ साली आलेल्या ‘बरसात’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तसे पाहिले तर वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून बॉबीने १९७७ साली आलेल्या ‘धरमवीर’ सिनेमात धर्मेंद्र यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. बॉबीने ‘गुप्त’, ‘सोल्जर’, ‘हमराज’, ‘अजनबी’, ‘अपने’ आदी हिट चित्रपटांमध्ये काम केले. मात्र तरीही त्याला यशस्वी कलाकार ही ओळख मिळत नव्हती.
मात्र ‘आश्रम’ या सेरीजने बॉबीला खऱ्या अर्थाने यशाची चव चाखवली. या सिरीजमधून बॉबीने त्याच्या अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनाही खुश केले. नुकताच बॉबीचा ‘लव्ह हॉस्टेल’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात त्याने ‘डागर’ हा खलनायक रंगवला असून, त्याच्या अभिनयाचे आणि भूमिकेचे खूपच कौतुक होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :