Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड ‘लव्ह हॉस्टेल’चा ट्रेलर प्रदर्शित, बॉबी देओलच्या क्रूर आणि दमदार भूमिकेने वेधले सर्वांचे लक्ष

‘लव्ह हॉस्टेल’चा ट्रेलर प्रदर्शित, बॉबी देओलच्या क्रूर आणि दमदार भूमिकेने वेधले सर्वांचे लक्ष

हिंदी चित्रपट जगताचा बादशहा अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान गेले अनेक दिवस कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. मुलगा आर्यन खानला अं’मली पदार्थ प्रकरणात अटक झाल्यानंतर शाहरुख खान बरेच दिवस ट्विटरपासून लांब गेला होता मात्र आता तब्बल चार महिन्यांनी अभिनेता शाहरुख खानने त्याच्या रेड चिलिज इंटरटेनमेंटच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

अभिनेता शाहरुख खान(Shahrukh khan) गेले अनेक दिवस सोशल मीडियापासून लांब होता मात्र आता वॅलेंनटाईन डे च्या मुहूर्तावर शाहरुखने ‘लव हॉस्टेल’ या आगामी वेब सिरीजचा ट्रेलर आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या सिरीजचे लेखन आणि दिग्दर्शन शंकर रमण यांनी केले आहे. यामध्ये विक्रांत आणि सान्या प्रेमी हे जोडपे आपल्या नात्याला टिकवण्यासाठी अनेक अडचणीतून जात असते. त्याच्यावरच ही संपूर्ण सिरीज आहे. महत्वाचे म्हणजे अभिनेता बॉबी देओल या बेव सिरीजमध्ये एका खलनायकाची भूमिका साकारत आहे. नेहमी हीरोच्या भूमिकेत दिसणारा बॉबी देओल पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारत आहे. सिरीजमध्ये त्याचा लूक भाषा, सगळेच दमदार वाटत आहे. डागर असे बॉबी देओलच्या या भूमिकेचे नाव असणार आहे. ‘लव हॉस्टेल’ 25 फेब्रुवारीला Zee 5 वर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

आपल्या या नव्या भूमिकेबद्दल बोलताना बॉबी देओल म्हणतो की ” डागर हे असे पात्र आहे ज्याचे स्वताचे विचार आहेत आणि या विचाराला त्याच्या नियमाला कोणी आडकाठी आणत असेल तर त्यांना तो प्रचंड त्रास देतो. तो अत्यंत क्रूर सराईत गुन्हेगार आहे. चित्रपटाचे लेखन मला खूप आवडले.”

या वेब सिरीजमधील प्रमुख कलाकार विक्रांतने सांगितले की” या चित्रपटात रोमँटिक सीन सोबतच अनेक अडचणींचा सामना करणार्‍या प्रेमी जोडप्याची कथा सुद्धा रंगवली आहे”. सोबतच सान्यानेही हा चित्रपट भन्नाट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता या सिरीजची जोरदार उत्सुकता लागली आहे. या वेब सिरीजच्या घोषणेने अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा ट्विटरवर सक्रिय झाला आहे. त्याने चार महिने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.

  • हे ही पाहा :

 

हे देखील वाचा