Thursday, April 24, 2025
Home मराठी ‘…आपण सामर्थ्यवान आहोत’, म्हणत मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केला सुंदर फोटो; तुम्हीही कराल कौतुक

‘…आपण सामर्थ्यवान आहोत’, म्हणत मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केला सुंदर फोटो; तुम्हीही कराल कौतुक

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत तिच्या लूक्सने नेहमी सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या ग्लॅमरस लूकचे लाखो चाहते आहेत. सुंदर चेहरा आणि आकर्षक फिगर असणाऱ्या पूजाची फॅन फाॅलोविंगही तगडी आहे. ही सुंदर अभिनेत्री दररोज आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

नुकतेच पूजाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यात तिचा अप्रतिम अंदाज पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने क्रीम कलरचा लाॅंग प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे. सोबतच खांद्यावर घेतलेली लाल रंगाची प्रिंटेड ओढणी तिचे लूक पूर्ण करत आहे. तसेच एकंदरित असा लूक करून पूजा अनोख्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसली आहे.

https://www.instagram.com/p/CO66u4ipcqJ/?utm_source=ig_web_copy_link

हा फोटो शेअर करत पूजाने कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, “आपण जितका विचार करतो, त्यापेक्षा अधिक आपण सामर्थ्यवान आहोत.” या फोटोचे कमेंट सेक्शन लाल हार्टच्या इमोजीने तुडुंब भरलेले दिसत आहे. यावरून लक्षात येते की, पूजाचा हा फोटोही चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

अभिनेत्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २०१० मध्ये आलेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. २०१५ साली आलेल्या ‘दगडी चाळ’ चित्रपटातील तिची भूमिका खूपच गाजली. यांनंतर २०१८ साली ‘लपाछपी’ या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल पूजा सावंतला ‘दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिला हिंदी चित्रपटांचीही ऑफर आली. २०१९ मध्ये आलेल्या ‘जंगली’ या चित्रपटात, ती विद्युत जामवालसोबत ती दिसली. यात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! हॉलिवूडमध्ये जाण्यास राखी सावंत सज्ज, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी पाडला कमेंटचा पाऊस

-डीप नेक बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाच्या जीवघेण्या अदा! पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

-‘तुम्ही असे उड्या मारत राहिलात तर…’, फिटनेस फ्रिक मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटच्या व्हिडिओवर युजरची मजेदार प्रतिक्रिया

-‘तुला पाहून फ्लॅट झालो राव!’ ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारच्या व्हिडिओवर चाहते झाले फिदा; एकदा पाहाच

हे देखील वाचा