Saturday, June 29, 2024

काळ्या अन् पांढर्‍या पट्ट्यांचा पोशाख परिधान केल्यामुळे शिल्पा झाली ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘शहरी झेब्रा’

शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. योगा, व्यायाम, लूक आणि डाएट यासारख्या गोष्टींमुळे ती अनेकदा चर्चेत असते. शिल्पा तिच्या चाहत्यांसोबत फिट राहण्यासाठी टिप्स देखील शेअर करत असते. अशात नुकतीच अभिनेत्री एका अवॉर्ड फंक्शनमध्ये दिसली. यादरम्यान शिल्पा खूपच स्टायलिश अंदाजात पाेहचली हाेती. मात्र, अभिनेत्रीला तिच्या लूकमुळे ट्रोल व्हावे लागले.

खरे तर, एका अवॉर्ड फंक्शनमध्ये शिल्पा शेट्टी (shilpa shetty) हिने हजेरी लावली होती. यावेळी शिल्पा शेट्टी नेहमीप्रमाणेच अतरंगी अंदाजात दिसली. पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेत्रीने काळ्या आणि पांढर्‍या पट्ट्यांचा पोशाख परिधान केला होता. यासोबत तिने गाेल्डन नेकलेस घातला होता आणि बोल्ड मेकअपही केला होता. अभिनेत्रीच्या या अवॉर्ड फंक्शनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीला सातत्याने ट्रोल केले जात आहे. अभिनेत्रीचा हा पोशाख नेटिझन्सना अजिबात आवडलेला नाही. एका युजरने अभिनेत्रीला ट्राेल करत लिहिले,’ डिस्कवरीचे लोकही कॅमेरा घेऊन आले आहेत.’ त्याच वेळी, एका युजरने कमेंट करत लिहिले, ‘झेब्रा’. अशात एक युजर म्हणाला, ‘पार्टीमध्ये झेब्रा.’ त्याच वेळी एका युजरने लिहिले,’अर्बन झेब्रा.’

शिल्पा शेट्टीच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेत्री लवकरच ‘केडी – द डेव्हिल’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासाेबत संजय दत्तही दिसणार आहे, जाे नकारात्मक भूमिका साकारणार आहे. यासोबतच शिल्पा ‘सुखी’ आणि ‘इंडियन फाेर्स’मध्येही दिसणार आहे.(bollyood actress shilpa shetty wear a black and white stripes outfit for award function users call her zebra )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्मृती इराणींनी विवाहितांना दिला मजेशीर सल्ला, शेअर केला दयाबेनचा ‘ताे’ व्हिडिओ, चाहते हसून हसून लाेटपाेट
राखी सावंत पुन्हा संकटात, ड्रामा क्वीनला पुन्हा माराव्या लागणार कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या चक्रा

हे देखील वाचा