Friday, December 1, 2023

इलियानाने प्रेग्नेंसीदरम्यान बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर लावली आग, एकदा पाहाच फाेटाे

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीने 18 एप्रिल रोजी तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली हाेती. तेव्हापासून ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. अशात  अलीकडेच अभिनेत्री पिवळ्या रंगाची बिकिनी घालून बीचवर पोहोचली, ज्याचे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. इलियाना तिच्या बेबीमूनचा चांगलाच आनंद घेत आहे, त्याची झलक नुकत्याच व्हायरल झालेल्या फाेटाेंमध्येही पाहायला मिळते.

इलियाना डिक्रूझ (ileana dcruze) हिने अलीकडेच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील काही फाेटाे शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये इलियाना प्रेग्नेंसीचा आनंद लुटताना दिसत आहे. पहिल्या फाेटाेत तिने पाय आणि समुद्राच्या येणाऱ्या लाटांचा फोटो शेअर केला आहे, ज्याला तिने कॅप्शन दिले, ‘सँडी टोज, हॅपी हार्ट’.

Ileana D'Cruz
Photo Courtesy: Instagram/ileana_official

दुसरीकडे, दुसऱ्या स्टाेरीत तिने एक क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये समुद्राच्या सुंदर लाटा दिसत आहेत. यानंतर तिसऱ्या फोटोमध्ये इलियाना पिवळ्या रंगाची बिकिनी घालून सनलाईटचा आनंद लुटताना दिसत आहे. या सर्व फोटोंमध्ये इलियानाने तिच्या रविवारच्या मस्तीबद्दल सांगितले आहे.

Ileana D'Cruz
Photo Courtesy: Instagram/ileana_official

मंडळी, इलियाना डिक्रूझ काही वर्षांपूर्वी एंड्रयू नीबोनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. अभिनेत्रीने एकदा इन्स्टाग्राम पोस्टवर नीबोनचा तिचा “बेस्ड हबी” म्हणून उल्लेख केला होता. अशाच दोघांचे लग्न झाले होते की, नाही हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र,  2019 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते. अशात अलीकडेच अशी बातमी आली होती की, इलियाना कॅटरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत आहे. ‘कॉफी विथ करण’ सीझन 7च्या एका एपिसोडमध्ये करण जोहरनेही त्यांच्या नात्याची पुष्टी केली होती.( bollywod actress ileana dcruze enjoy her babymoon in beach share pictures in babybump)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुणीतरी येणार गं! अभिनेत्री स्वरा भास्करने दिली गुडन्यूज; पोस्ट शेअर करत म्हणाली…

प्रतीक्षा संपली! भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार चाहत्यांच्या भेटीला

हे देखील वाचा