Friday, July 5, 2024

नुक्कड फेम अभिनेते समीर खक्कड यांचे दुःखद निधन

प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते समीर खक्कड यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समीर खक्कड यांनी ८० च्या दशकात दूरदर्शनवरील लोकप्रिय आणि तुफान गाजलेल्या ‘नुक्कड’ या मालिकेत एका दारुड्या व्यक्तीची ‘खोपडीची’ भूमिका केली होती. त्यांची ही भूमिका खूपच गाजली. हीच भूमिका त्यांची ओळख देखील बनली.

समीर खक्कड यांचे बंधू असलेल्या गणेश खक्कड यांनी त्यांच्या मृत्यूचे कारण सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, समीर यांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. मागील काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. १४ मार्च रोजी त्यांना कपारी श्वास घ्यायला त्रास जाणवू लागल्यामुळे बोरिवली येथील एमएम हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तेव्हा ते बेशुद्ध झाले होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवले होते. मात्र अनेक अवयव निकामी होत गेल्यामुळे १५ मार्च रोजी सकाळी ४.३० ला त्यांचे निधन झाले. बोरिवली येथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहे.

दरम्यान समीर खक्कड हे मुंबईच्या बोरिवली मध्ये आयसी कॉलनीमध्ये एकटे राहायचे. त्यांची पत्नी अमेरिकेत राहते. ते शेवटचे अमेझॉन प्राइमच्या ‘फर्ज़ी’ या सिरीजमध्ये दिसले होते. त्यांनी मनोरंजन, सर्कस आदी मालिकांमध्ये तर परिंदा, ईना मीना डीका, दिलवाले, राजा बाबू, आतंक ही आतंक, रिटर्न ऑफ ज्वेल तीफ़, शहंशान, अव्वल नंबर, प्याए दीवाना होता है, हम हैं कमाल के अशा चित्रपटांमध्ये चरित्र भूमिका साकारल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी: अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

दिग्दर्शक रोहित शेट्टी एकेकाळी या अभिनेत्रीच्या होता प्रेमात; नक्की कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घ्याच

हे देखील वाचा