शहीद भगतसिंग यांचे जीवन म्हणजे धगधगता लाव्हा.! त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित हे 7 चित्रपट, एकदा पाहायलाच हवेत

शहीद भगतसिंग यांचे जीवन म्हणजे धगधगता लाव्हा.! त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित हे 7 चित्रपट, एकदा पाहायलाच हवेत


शहीद भगतसिंग यांनी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी देशासाठी बलिदान दिले होते. भगतसिंग यांचे विचार अजूनही जिवंत आहेत. बॉलीवूडमध्ये वेळोवेळी असे चित्रपट बनले गेले आहेत, जेणेकरून त्यांना आठवले जावे व तरुणांमध्ये जोश निर्माण व्हावा. 2002 मधे भगतसिंग यांच्यावर 3 चित्रपट प्रदर्शित झाले होते.

अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘द लिजेंड आॉफ भगतसिंग’ हा चित्रपट जून 2002 मधे प्रदर्शित झाला होता, यामध्ये अजय देवगण भगतसिंगच्या भूमिकेत चांगलाच गाजला होता. या चित्रपटासाठी अजयला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

दिनांक 7 जून 2002 मध्ये प्रदर्शित झालेला दुसरा चित्रपट होता ‘शहीद’. यामध्ये बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसला होता. देओल बंधू बॉबी आणि सनी या दोघांनीही या चित्रपटात काम केले आहे. बॉबीने भगतसिंगची व्यक्तिरेखा अगदी चमकदारपणे निभावली आणि चंद्रशेखर आझादच्या भूमिकेत सनी जबरदस्त अभिनय करताना दिसला. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुड्डू धानोआ यांनी केले होते.

Shaheed Bhagat Singh Film
Shaheed Bhagat Singh Film

सोनू सूद यांचा ‘शहीद ए आजम’ चित्रपटही 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात शमा सिकंदरने मुख्य भूमिका साकारली होती, तसेच चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करता आली नाही. हा चित्रपट लोकांना फार प्रभावित करू शकला नाही.

सिद्धार्थ भगत यांच्या 2006 मधे आलेल्या ‘रंग दे बसंती’ या चित्रपटात आमिर खान भगतसिंगच्या भूमिकेत दिसला होता. दक्षिणी सुपरस्टार सिद्धार्थचा ‘मेरी दूल्हन तो आझादी है’ हा डायलॉग चांगलाच गाजला होता. हा चित्रपट प्रेक्षकांव्यतिरिक्त समीक्षकांनाही आवडला.

मनोज कुमारने 1965 मधे आलेल्या ‘शहीद’ मध्ये भगतसिंगची भूमिका साकारत भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पडद्यावर जिवंत केले होते. भगतसिंगांच्या जीवनावर बनलेला हा देशभक्तिपर चित्रपट सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले जाते.

प्रेम आदीबने प्रथमच भगतसिंगची भूमिका साकारली ती म्हणजे ‘शहीद ए आजाद भगत सिंह’ मध्ये. भगतसिंग शहीद झाल्यानंतर 23 वर्षानंतर 1954 मध्ये हा चित्रपट बनला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक जगदीश गौतम होते. यात जयराज आणि स्मृती विश्‍वास हे प्रेम आदीब सोबत मुख्य भूमिकेत दिसले होते.

शम्मी कपूर यांनीही भगतसिंगवर आधारित चित्रपटात काम केले आहे. ‘शहीद भगतसिंग’ हा चित्रपट भगतसिंग यांच्यावर बनलेल्या पहिल्या चित्रपटाच्या 9 वर्षानंतर आला होता. या चित्रपटात शम्मी कपूर यांनी फ्रीडम फाइटरची भूमिका साकारली होती. तथापि, चित्रपट त्या काळात फ्लॉप ठरला.


Leave A Reply

Your email address will not be published.