Monday, January 19, 2026
Home बॉलीवूड ‘लोकांना मदत करा, ऑक्सिजन-बेडची सोय करा,’ म्हणणाऱ्या युजरला अभिषेक बच्चनने दिले असे उत्तर

‘लोकांना मदत करा, ऑक्सिजन-बेडची सोय करा,’ म्हणणाऱ्या युजरला अभिषेक बच्चनने दिले असे उत्तर

आजकाल सगळीकडेच कोरोनाची भयानक परिस्थिती आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या बळीची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या सगळ्यातच अनेक कलाकार कोरोना रुग्णांसाठी धावून आले आहेत. अक्षय कुमार, सोनू सूद यासारखे कलाकार कायमच मदतीसाठी पुढे असताना आपण बघत आलो आहोत. तर काही कलाकारांनी मदत न केल्यामुळे ते मोठया प्रमाणात ट्रोल होताना दिसत आहेत.

अभिषेक बच्चन आजकाल आपल्या ‘द बिग बुल’ चित्रपटासाठी चर्चेत आहे. सोशल मीडियावर तो खूप अ‍ॅक्टिव्ह असतो आणि, ट्रोलर्सला उत्तर देऊन तो त्यांची बोलतीही बंद करताना बऱ्याचदा दिसत असतो. कोरोना व्हायरसच्या या दुसर्‍या लाटेत अनेक बॉलिवूड सेलेब्स मदत करत आहेत. अशा परिस्थितीत अभिषेक बच्चन याच्या ट्विटनंतर एका युझरने त्याच्या मदतीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, त्यानंतर अभिषेकने त्या युझरला योग्य उत्तर देऊन शांत केले.

कोरोनामधील वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर अभिषेक बच्चनने एक ट्विट करून लोकांना सकारात्मकता दिली आहे. त्याने लिहिले- ‘तुमच्या सर्वांसाठी आभासी मिठी. यावेळी प्रत्येकाला प्रेमाची आवश्यकता आहे तरीपण, अशा वेळी मास्क सगळ्यांनी घालायलाच पाहिजे.’

हे ट्वीट पाहिल्यानंतर एका युझरने लिहिले, ‘आशा आहे की, तुम्ही आभासी मिठी पाठविण्याव्यतिरिक्त काही केले असेल. ऑक्सिजन अभाव आणि रुग्णालयात बेड नसल्यामुळे लोक मरत आहेत. सर, फक्त मिठी मारून काहीही होणार नाही.’

या ट्विटला उत्तर देताना तो म्हणाला- “हो मॅम, आता मी सोशल मीडियावर काहीही बोलत नाही, याचा अर्थ असा नाही की, मी काही करत नाही. आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. या क्षणी परिस्थिती चांगली नाही, म्हणून प्रेम आणि सकारात्मकता देखील आपल्याला मदत करू शकते.”

अभिषेक बच्चन हा हल्ली वेगवेगळ्या कारणामुळे ट्रोल  होताना दिसत आहे. या आधीपण द बिग बुल चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी, अभिषेक बच्चन मोठया  प्रमाणात ट्रोल  झाला होता. पण त्याने युजरला अगदी योग्य उत्तर देत शांत केले होते. अभिषेक बच्चन आपल्या चोख उत्तराने कायमच सगळ्यांना गप्प्पा करत आला आहे.

 

हे देखील वाचा