Wednesday, July 3, 2024

सलमानच्या लूकने नव्हे तर घड्याळाने वेधले चाहत्यांचे लक्ष, किंमत वाचून तुम्ही व्हाल थक्क

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा बहुप्रक्षिपेत चित्रपट ‘किसी का भाई, किसी की जान‘ हा 21 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधी सलमान खान आपल्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. यासाेबतच भाईजान आपल्या वेगळ्या लूकने आणि फिटनेसने लोकांना चकित देखील करत आहे.

बॉलिवूडचा दबंग सलमान खान (salman khan) त्याच्या साध्या स्टाईलने चाहत्यांना प्रभावित करतो, पण यावेळी लोकांचे लक्ष भाईजानच्या लूकने नाही, तर त्याच्या घड्याळाने वेधले आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर पांढऱ्या टी-शर्टमध्ये टेबलावर हात ठेवून एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सलमान खानने हातात रोलेक्स घड्याळ घातले आहे, ज्याची किंमत खूप जास्त आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

फिल्मफेअरच्या प्रेस कॉन्फरन्सपासून सलमान खान अनेक प्रसंगी हे घड्याळ घालताना दिसला आहे. सलमान खानने घातलेले घड्याळ रोलेक्स प्रीमियम आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, या घड्याळाची किंमत जवळपास 57,200 डॉलर्स आहे, म्हणजेच भारतीय रुपयानुसार त्याची किंमत 47 लाख रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने गेल्या वर्षी त्याच्या वाढदिवशी स्वतःला हे घड्याळ गिफ्ट केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

‘किसी का भाई, किसी की जान’ या चित्रपटात सलमान खानसाेबत पूजा हेगडे पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सध्या ‘किसी का भाई, किसी की जान’ची एडवांस बुकिंग सुरू झाली असून पहिल्याच दिवशी त्याचा चित्रपट किमान 20 ते 25 कोटींचा व्यवसाय करेल अशी अपेक्षा आहे.(bollywood actor म wore gold and diamond rolex watch price will shock you )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ जगप्रसिद्ध डान्सर, गायक असणाऱ्या कलाकाराचे वयाच्या २५ व्या वर्षी दुःखद निधन
आकांशा दुबेचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल म्हणाली, ‘मला काही झाल्यास त्याला जबाबदार…’

हे देखील वाचा