बाॅलिवूड अभिनेता अभय देओल सध्या त्याच्या ‘ट्रायल बाय फायर‘ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ही वेबसीरिज 1997च्या उपहार सिनेमा अग्निकांडवर आधारित आहे. अभिनेता अभय त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान अभयने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही आश्चर्यकारक खुलासे केले आहेत.
अभिनेता अभय (abhay deol) याने सांगितेल की, का त्याला प्रसिद्धीचा तिरस्कार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभय म्हणाला, “मी एका चित्रपट कुटुंबात वाढलाे असल्याने लहानपणीपासूनच प्रसिद्धी खूप जवळून पाहिली. मला ते आवडत नाही. कारण, ते तुमची गोपनीयता काढून घेते. तुमच्याबद्दल खूप काही लिहिले जाते. मला प्रसिद्धी आणि प्रसारमाध्यमांचा खरोखरच तिरस्कार होता. कारण, मी लहानपणी माझ्या कुटुंबाविषयी खूप काही लिहिलेले पाहिले, ‘हे खरे आहे का, ते खरे आहे का?’ यामुळे मला राग यायचा. तुझे वडील चित्रपटात काम करतात, तुझे काका मोठे स्टार आहेत. साहजिकच जे काही लिहिले जायचे, ते मला शाळेत विचारायचे. मी कुटुंबाच्या आजूबाजूला अशी अनेक लोक पाहिले आहेत,जे मित्र नव्हते तर फायद्यासाठी होते.”
View this post on Instagram
तो पुढे देव डीबद्दलही बोलला. अभयने सांगितले की, ‘देव डीची भूमिका केल्यानंतर एक वर्ष तो या पात्रातून बाहेर पडू शकला नाही.’ अभिनेत्याने पुढे सांगितले की, ‘त्या दिवसात तो न्यूयॉर्कमध्ये होता.’ अभय म्हणाला, “मी फाटक्या कपड्यात रस्त्यावर आलो नव्हतो,पण मी रोज मुर्खासारखा प्यायचो. मी काही खूप चांगले मित्र बनवले आहेत, त्यामुळे मला काही गोष्टी आठवतात.”
अभय देओल याच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘जिंदगी ना मिलेगी दाेबारा’, ‘साेचा ना था’, ‘हॅपी भाग जायेगी’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे.(bollywood actor abhay deol talks about his personal life said i drank everyday like his character devd)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुंडली भाग्य मालिकेमध्ये येणार २० वर्षांचा लीप, ‘हा’ मुख्य अभिनेता सोडणार मालिका?
कबीर बेदीने वयाच्या 70 व्या वर्षी 30 वर्षांनी लहान प्रेयसीसाेबत केले लग्न, वाचा संपूर्ण किस्सा