Wednesday, July 3, 2024

आदिलने चक्क पॅपराझींसमाेर दाखवला हनीमूनचा व्हिडिओ; राखी सावंत लाजत म्हणाली…

ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिने सात महिन्यांपूर्वी आदिल खान दुर्राणीशी लग्न केले होते, ज्याचा खुलासा तिने काही दिवसांपूर्वी केला होता. राखीच्या लग्नाची चर्चा संपली तेव्हा तिच्या आईची ढासळलेली तब्येत उघड झाली. आता या अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि खोडकरपणा दिसत आहे.

तर झाले असे की, राखी सावंत (rakhi sawant) आणि आदिल खान (adil khan) पॅपराझींच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. यादरम्यान, तिने आदिलला दुबईत दिलेली भेटवस्तू दाखवण्यास सांगितले. आदिल त्याच्या फोनवरून मीडियासमाेर व्हिडिओ आणि फोटो स्वाइप करत होता, ज्यादरम्यान त्यांचे काही वैयक्तिक व्हिडिओ सुरु झाले.

राखीच्या लक्षात आले की, कॅमेऱ्यात काहीतरी वेगळे दाखवले जात आहे, तेव्हा ती लाजली आणि आदिलला म्हणाली, ‘हा तर बेड दिसत आहे जान, काय करत आहात? हनीमूनचा बेड दिसत आहे.’ हे ऐकून आदिललाही लाज वाटली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Delhi Times (@delhi.times)

यानंतर त्याने ताे व्हिडिओ प्ले केला, ज्यामध्ये राखी सावंतला काय गिफ्ट देण्यात आले आहे हे दाखविले. आदिलने राखीला सोन्याचा फोन दिला आहे, जो खास राखीसाठी तयार करण्यात आला होता.

तत्पूर्वी राखीसोबत लग्न केल्याच्या गोष्टीवर आदिल खान सतत नकार देत होता. मात्र, नंतर त्याने लग्न केल्याचे कबूल केले. आदिल खानने सोशल मीडियावर त्या दोघांच्या लग्नाचा फोटो पोस्ट केला आणि सांगितले की, ‘ते विवाहित असून, त्याने कधीच त्यांचे लग्न झाल्याचे अमान्य केले नाही. सध्या तो काही गोष्टी ठीक करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmymantra Media (@filmymantramedia)

अशातच राखी सावंतच्या आईला कॅन्सरनंतर ब्रेनट्युमर झाल्याचे निदान झाले आहे. सध्या तिची आई उपचारासाठी ऍडमिट असून, मुकेश अंबानी तिच्या आईवर उपचार करत आहे.(bollywood actor adil khan plays honeymoon bedroom video of rakhi sawant and him in front of paparazzi)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाथरूमच्या भिंतीतून बाहेर आले नोटांचे बंडल; प्रश्न उपस्थित झाल्यावर अभिनेत्री म्हणाली, ‘वेश्याव्यवसाय करून…’

सबाच्या ‘या’ गाेष्टीवर आले ऋतिकचे मन! ट्विटरवरून सुरू झाली लव्हस्टोरी, अशी आहे संपूर्ण कहाणी

हे देखील वाचा