अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३‘ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी ३’ १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी व्यतिरिक्त सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी, अमृता राव आणि संजय मिश्रा हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
‘जॉली एलएलबी ३’ हा या कोर्टरूम ड्रामा फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. यापूर्वी चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. पहिल्या भागात अर्शद वारसीने मेरठचा राहणारा जॉलीची भूमिका केली होती. तर दुसऱ्या भागात ‘जॉली एलएलबी २’ मध्ये अक्षय कुमार जॉलीच्या भूमिकेत दिसला होता. हा जॉली कानपूरचा आहे. आता दोन्ही जॉली पहिल्यांदाच चित्रपटाच्या तिसऱ्या भागात एकत्र दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
ऐश्वर्या नंतर आता पती अभिषेकनेही ठोठावला कोर्टाचा दरवाजा; या कारणासाठी दाखल केली याचिका…