Saturday, April 20, 2024

अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित; ‘या’ तारखेला थिएटरमध्ये येणार

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार(Akshay Kumar) ‘राम सेतू’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. आज नवरात्रीच्या मुहूर्तावर अक्षयने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि चित्रपटाचा टीझर (Ram Setu Teaser) आपल्या चात्यांसोबत शेअर केला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आज सकाळीच अक्षयने चित्रपटाच्या नवीन पोस्टरसोबत रिलीज डेटची घोषणा केली होती त्यांतर आता अक्षयने या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.

‘राम सेतु’चा टीझर प्रदर्शित
अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘राम सेतु’चा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षयचा एक नवा लूक पाहायला मिळत आहे. काही सेकंदाच्या या टीझरमध्ये दमदार अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. तसेच चित्रपटाचा टीझर पाहून हा बिग बजेट चित्रपट असल्याचं दिसून येतं.

“राम सेतू को बचाने के लिए हमारे पास सिर्फ तीन दिन है” या अक्षयच्या संवादाने टीझरची सुरुवात होते. त्यानंतर अ‍ॅक्शन सीन्सची झलक यामध्ये पाहायला मिळत आहे. तसेच जॅकलिन फर्नांडिस( Jacqueline Fernandez) ही या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसेल. चित्रपटाच्या टीझरमध्ये जॅकलिनच्या लूकची झलक पाहायला मिळत आहे.

अक्षयच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केलं आहे. रामायणापासून प्रेरित होऊन या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. अभिनेत्री नुसरत भरुचाही चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. हा टीझर पाहिल्यानंतर ब्लॉकबस्टर टीझर, अक्षय कुमार इज बॅक अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार चित्रपट
राम सेतूचा डिजिटल पार्टनर प्राइम व्हिडिओज आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अक्षयने पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटाच्या ओटीटी पार्टनरची माहिती आधीच दिली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शानदार, जोरदार, जबरदस्त!’शिवप्रताप गरुडझेप’चा ट्रेलर रिलीज

रोजंदारीवर काम करणारी वर्षा बुमराह ठरली ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स’ ची विजेती

हे देखील वाचा