Tuesday, July 9, 2024

बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ने केले ‘असे’ ट्वीट की झाला भलताच ट्रोल, नेटकरी म्हणालेे ‘ईदलाही हेच म्हणणार?’

होळीच्या निमित्ताने सगळे बॉलिवूड कलाकार होळी खेळताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या चाहत्यांना देखील होळीच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे होळी खेळतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यातच अक्षय कुमारचे नाव सोशल मीडियावर खूपच ट्रेंड होताना दिसत आहे. सगळे त्याच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत आहे. आणि त्या सोबतच ट्रोल देखील करत आहे.

खरं तर अक्षय कुमारला त्याच्या होळीवरील ट्वीटसाठी ट्रोल केले जात आहे. अक्षय कुमारने असे ट्वीट केले आहे की,”डू मी ए फेव्हर नॉट प्ले होली. तुमच्या घरासाठी आणि घरातल्या माणसाच्या सुरक्षिततेसाठी घरीच होळी खेळा. तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा!” अक्षय कुमारच्या या ट्विटचा अर्थ असा होता की, सगळ्यांनी कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करावे. त्याच्या शिवाय अनेक कलाकारांनी देखील घरी सुरक्षित राहण्याचा संदेश दिला आहे.

अक्षय कुमारच्या ‘लेट्स नॉट प्ले होली’ म्हणजेच होळी खेळू नका या वाक्याने सगळ्यांना खूपच वाईट वाटले आहे. यानंतर त्याला खूप ट्रोल केले गेले आणि ट्विटर वर #पूर्ण_बहिष्कार_अक्षय कुमार हा हॅशटॅग ट्रेंड झाला. एका युजरने कमेंट केली की, “अक्षयच्या या ट्विटला सगळ्यांनी पटकन सेव करून ठेवा. कारण ईदच्या वेळेस अक्षय कुमार अस नाही म्हणणार की ईद नका साजरी करू आणि परिवाराच्या सुरक्षेसाठी घरीच साजरी करा आणि लाखो प्राण्यांचा जीव वाचवा.”

काही प्रेक्षकांनी अक्षय कुमारचे समर्थन देखील केले आहे. काही युजरने असे म्हटले आहे की, अक्षयच्या ट्विटचा चुकीचा अर्थ काढला जातोय. पहिली ओळ ही त्याच्या गाण्याची ओळ आहे, आणि दुसऱ्या ओळीत तो कोरोना सुरक्षिततेसाठी म्हणत आहे. यात काही जण त्याला ट्रोल करत आहे, तर काही त्याचे समर्थन करताना दिसत आहे.

https://twitter.com/Akshaysuniverse/status/1376463775017005062

यासोबतच अक्षय कुमारने त्याचा एक फोटो शेअर केला आहे.

यामध्ये तो त्याची मुलगी नितारासोबत होळी खेळताना दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने असे कॅप्शन दिले आहे की, “जी माणसं तुमच्या हृदयच्या जवळ असतात, त्यांच्यासोबत सण साजरा करायचा आनंद काही वेगळाच असतो.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुशांतच्या गोड आठवणी! होळीदरम्यानचा थ्रोबॅक व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

हे देखील वाचा