Wednesday, August 13, 2025
Home बॉलीवूड ‘जोधा अकबर’ फेम अमन धालीवालवर जिममध्ये हल्ला, चोरट्यांनी अभिनेत्याला केले चाकूने जखमी

‘जोधा अकबर’ फेम अमन धालीवालवर जिममध्ये हल्ला, चोरट्यांनी अभिनेत्याला केले चाकूने जखमी

जोधा अकबर‘ आणि ‘बिग ब्रदर‘ सारख्या प्रसिद्ध चित्रपटात दिसलेला पंजाबचा लाेकप्रिय अभिनेता अमन धालीवाल याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेता स्वत:ला वाचवताना दिसत आहे. मात्र, हल्लेखोरापासून बचाव करताना तो जखमी झाला आहे.

हा व्हिडिओ एका युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. ही घटना अमेरिकेत सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने अभिनेत्याचा हात धरला असून त्याच्या हातात कुऱ्हाड आहे. जीममध्ये अभिनेत्यावर हल्ला करणारा व्यक्ती ‘मला पाणी पाहिजे’ असे म्हणताना दिसत आहे. यादरम्यान, व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, हात धरलेल्या व्यक्तीचे लक्ष इकडे-तिकडे फिरताच अभिनेता त्याला लगेच पकडताे.

या व्हिडिओमध्ये कॅलिफोर्नियाच्या जिममध्ये उपस्थित असलेले काही साथीदारही अभिनेत्याला मदत करताना दिसले आणि त्यांनी हल्लेखोराला घट्ट पकडले. वृत्तानुसार, हल्लाखाेर व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

जिममध्ये झालेल्या या घटनेत पंजाबी अभिनेत्याला खूप दुखापत झाली आहे. अभिनेत्याचे कपाळ रक्ताने भरल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, या घटनेनंतर अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या व्हायरल व्हिडिओशिवाय, अभिनेत्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये त्याच्या डोक्याशिवाय त्याच्या खांद्यावर, मानेवर आणि हातावर अनेक जखमा आहेत.

पंजाबचा प्रसिद्ध अभिनेता अमन धालीवालने 2003 मध्ये मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने 2007 मध्ये आलेल्या सनी देओलच्या ‘बिग ब्रदर’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाशिवाय तो 2008 मध्ये आलेल्या ‘जोधा अकबर’ चित्रपटातही दिसला होता. या चित्रपटात त्यांनी राजकुमार रतन सिंगची भूमिका साकारली होती. हिंदी चित्रपट आणि पंजाबी चित्रपटांव्यतिरिक्त अभिनेता टीव्ही शोमध्येही दिसला आहे.(bollywood actor aman dhaliwal stabbed at us gym known for jodhaa akbar video goes viral on internet )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नकारात्मक भूमिकांमधून ओळख मिळवलेल्या अनन्याने प्रभावी अभिनयाच्या जोरावर कोरले राष्ट्रीय पुरस्कारावर नाव

अलाना पांडेच्या संगीत साेहळ्यात लाेकांच्या नजरा सुहानाने नव्हे, तर ‘या’ मुलीने वेधल्या

हे देखील वाचा